TRF वर अमेरिकेची मोहर! पाकिस्तानचा पारा चढला, भारतावरच उलटे आरोप

Pakistan Denies Link To Pahalgam Attack : अमेरिकेने (America) लष्कर-ए-तैयबाच्या फ्रंट संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या पाकिस्तानस्थित गटाला ‘जागतिक दहशतवादी संघटना’ घोषित केलं. या निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan) स्पष्टपणे अस्वस्थ झाला असून, त्यांनी हा हल्ला आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंध खोटा आणि निराधार असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानने आरोप फेटाळले
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, पहलगाम हल्ल्याचा संबंध पाकिस्तानमधील कोणत्याही संघटनेशी जोडणे चुकीचे आहे. आम्ही अशा सर्व निष्क्रिय संघटनांचे नेटवर्क प्रभावीपणे उध्वस्त केले आहे. त्यांच्या सदस्यांना अटक करून खटले चालवले आहेत. तसेच, त्यांनी TRF हा सध्या अस्तित्वात नसलेला गट असल्याचंही सांगितलं. पाकिस्तानने हेही सांगितलं की, त्यांच्या भूमीतून अशा प्रकारच्या कारवायांना प्रोत्साहन देण्याचा आरोपही आधारहीन आहे. TRF ला लष्कर-ए-तैयबाची ‘आघाडी संघटना’ म्हणण्याच्या दाव्यालाही त्यांनी फेटाळले.
अहिल्यानगरमध्ये बुद्धिबळ महोत्सव!‘नरेंद्रजी फिरोदिया चषक’ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
अमेरिकेचे गंभीर पाऊल
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या गटाला Foreign Terrorist Organization (FTO) आणि Specially Designated Global Terrorist (SDGT) म्हणून घोषित केलं आहे. या संघटनेला लष्कर-ए-तैयबाशी थेट जोडण्यात आले असून, TRF चा प्रमुख शेख सज्जाद गुल याला पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मानण्यात आलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी निवेदनात म्हटलं की, ही कारवाई हल्ल्यातील निष्पाप नागरिकांसाठी न्याय मिळवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे. TRF आणि त्याच्याशी संलग्न गटांचा जगभर दहशत पसरवण्यात मोठा वाटा आहे.
Video : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं; वाचा, कुठल्या प्रश्नांवर झाली चर्चा अन् वाद
भारताची काय प्रतिक्रिया?
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं की, भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्य मजबूत असून, TRF ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय हे या भागीदारीचं प्रतीक आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. प्रारंभी या हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली होती. मात्र, भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर TRF ने आपली जबाबदारी नाकारली.