देशभरातील बुद्धिबळपटूंनी गाठले अहिल्यानगर; ‘नरेंद्रजी फिरोदिया चषक’ स्पर्धेची रंगत

Narendraji Firodia Cup Chess Tournament In Ahilyangar : अहिल्यानगर (Ahilyangar)जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे दुसरी ‘नरेंद्रजी फिरोदिया चषक’ अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात (Chess Tournament) आलीय. या स्पर्धेला शनिवारी औपचारिक सुरुवात झाली. या तीन दिवसीय बुद्धिबळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते, पारंपरिक शतरंज पटावर चाल देऊन करण्यात आले. ही स्पर्धा 18 जुलै ते 20 जुलै 2025 हे तीन दिवस पार पडत आहे.
कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, उपस्थिती लक्षणीय
या वेळी संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी उपस्थितांचे स्वागत करत स्पर्धेची पार्श्वभूमी उलगडून सांगितली. प्रारंभ समारंभात संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक बुद्धिबळ प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितांमध्ये नागनाथ हलकुडे, योगेश रवंदळे, पारुनाथ ढोकळे, सुबोध ठोंबरे, श्याम कांबळे, प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, स्वप्निल बंगूरकर, सुनील जोशी, विष्णू कुद्रे, संजय खडके, अनुराधा बापट, रोहिणी आडकर, शुभदा ठोंबरे, डॉ. स्मिता वाघ, पंच प्रवीण ठाकरे, शार्दुल टापसे, पवन राठी, सनी गुगळे, शिरीष इंदुरकर, देवेंद्र ढोकळे, प्रशांत धगेकर, गोरक्षनाथ पुंड, चेतन कड, मनीष जसवानी, शिवम ठाकुर, योगेश खंडाळे, वल्लभ कुलकर्णी, गजानन चिपळूणकर यांचा समावेश होता. पालक व खेळाडूंचीही मोठी गर्दी लक्षवेधी ठरली.
‘या’ राशींवर आज देवी लक्ष्मीची कृपा, धनलाभ होणार! तुमचे आजचे राशिभविष्य काय सांगते?
देशभरातून बुद्धिबळपटूंचा सहभाग
सचिव यशवंत बापट यांनी माहिती दिली की, या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून जसं की गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा, पांडिचेरी, हरियाणा, ओरिसा आणि मध्य प्रदेश अशा जवळपास 25 राज्यांमधून सुमारे 450 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नरेंद्र फिरोदिया यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सर्वात कमी वयाचा 4.5 वर्षांचा बाल खेळाडू आणि सर्वात ज्येष्ठ 83 वर्षांचे वयोवृद्ध खेळाडूही सहभागी झाले आहेत.
Video : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं; वाचा, कुठल्या प्रश्नांवर झाली चर्चा अन् वाद
नवीन संधी व प्रेरणेसाठी प्रयत्नशील : नरेंद्र फिरोदिया
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नरेंद्र फिरोदिया म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना खेळाडूंसाठी नवीन संधी निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. क्लासिक फिडे रेटिंग स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे. बुद्धिबळ हा फक्त खेळ नाही तर मेंदूचा व्यायाम आहे. अशा स्पर्धांमधून खेळाडूंना आत्मविश्वास व नवी दिशा मिळते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभारप्रदर्शन खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी केले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेचे वातावरण खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांनी गजबजून गेले होते.
View this post on Instagram