Vijay Chaudhary : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे भाजप नेते विजय चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. विजय चौधरींविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार हिना गावितांबाबतच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चौधरी यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विजय चौधरींविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar City Police Station) दाखल करण्यात आला होता. माजी खासदार हिना गावित यांच्या भावाकडून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे विजय चौधरी यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून या प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांचे काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) तसेच माजी खासदार हिना गावित (Heena Gavit) यांच्याबद्दल बोलत आहे. यावेळी विजय चौधरी यांच्याकडून रक्षा खडसे आणि हिना गावित यांच्याविरोधात अनेक अपशब्द वापरण्यात आले आहे. याच प्रकरणात आता विजय चौधरी यांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांनी भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा देखील दिला आहे.
अमेरिकेला मोठा धक्का, इस्त्रायल विरोधात सौदी अरेबिया करणार संरक्षण करार
