आम्ही बोललो की लोक म्हणतात भाजपवाल्यांना हिंदू मुस्लिम करण्याची सवय आहे. (Jagatap) परंतु, आता संग्राम जगतापही बोलत आहेत हे तरी कक्षात घेऊन तुम्ही गंभीर व्हा मित्रांनो असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आहिल्यानगरच्या आक्रोश मोर्चात जोरदार घणाघात केला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. त्याचबरोबर या मुस्लिमांना भारत हा युद्ध भूमी वाटतो देश वाटत नाही. यांनी देशा ठेवलं नाही पाहिजे अस स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितल.
त्याचबरोबर, ज्या ज्या दुकानांवर अहमदनगर नावाची पाटी दिसेल त्या दुकांनांवर शॉप कायद्यानुसार तक्रार दाखल करा आणि ही दुकानं उद्वस्त करा असंही पडळकर म्हणाले आहेत. तसंच, इधलं खाता, इथ राहता आणि दुसऱ्ये देशाचं कौतूक करता हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हाला राहायचं असेल तर इथले नियम लागू होतील. अन्यथा, तुम्ही तुमची बॅग भरा आणि निघा असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत. तसंच, तुम्ही जर असले चाळे येथे केले तर कुणीही हे सहन करणार नाही. तुम्हाला मी असा इशारा देतो असंही ते म्हणाले.
हैद्राबादचा खुराट बोकडा आला अन् बडबड करुन गेला; संग्राम जगतापांचं ओवैसींना खोचक प्रत्युत्तर
काश्मीरमध्ये १०० टक्के हिंदू होते. आज तिथली काय परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात या लोकांना आश्रय मिळतो असा आरोपही पडळकर यांनी केला आहे. त्याचबरोबर आहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त जमीन जिहाद होत आहे. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. ही काय तुमच्या बापाची जागा नाही. माझा जन्मादाता बाप वेगळा असला तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आंबेडकर हे सुद्धा माझे बाप आहेत असंही ते म्हणाले आहेत.
आज महाराष्ट्रातील सर्व हिंदू लोकांच्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असला पाहिजे. त्यांच्यामुळे आज आपल्याला ही संधी मिळाली आहे असंही पडळकर म्हणाले आहेत. कोण पिलावळ दोन दिवसांपूर्वी इथ सभेत आली होती. त्यांनी आम्ही अहिल्यानगर बोलणार नाही अशी भूमिका घेतली, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असंही पडळकर म्हणाले. तसंच, पहिल्यांदा राष्ट्र, धर्मा आणि जाती अशी आपली रचना आहे. त्यामुळे जात जपली पाहिजे असंही ते म्हणाले. तसंच, नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्यावर बोलता. तुम्ही आले तर तुम्ही कबरीत जाताल असंही पडळकर म्हणाले.
तुम्ही कितीही प्रयत्न केला, तरी हरांची नाव बदलू शकत नाहीत. तुम्ही बदलाल, संपताल पण नाव बदलू शकत नाहीत. ज्याला कुणाला संभाजीनगर नको आहे, कुणाला धाराशिव नको आहे, ज्यांना कुणाला आहिल्यानगर नको आहे ते सगळे धर्मविरोधी आहेत असंही पडळकर यावेळी म्हणाले. तसेच, संग्रा जगताप यांच्यासोबत आम्ही आहोत, सोबत रहाणार. हे काही एड्यागबाळ्याचं काम नाही असंही पडळक यावेळी म्हणाले.