Mummaka Sudarshan : एसपी ऑन एक्शन मोड! गुन्हेगाराशी संबध? ‘तो’ पोलीस निलंबित
Mummaka Sudarshan : श्रीरामपूरातील सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेला पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला जिल्हा पोलीस अधीक्षक
Mummaka Sudarshan : श्रीरामपूरातील सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेला पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निलंबित केले आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पोलीस कर्मचारी शंकर चौधरी याला चौकशीअंती पोलीस सेवेतून निलंबित केले आहे. शंकर चौधरी याचे गुन्हेगारांशी व अवैध धंदेवाल्यांशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्याने ही कारवाई केल्याची माहिती समजत आहे.
शंकर चौधरी (Shankar Chaudhary) हा सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नेमणूक श्रीरामपूर (Shrirampur) येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात होती. मात्र, त्याच्याविरुद्ध गुटखा तस्करीशी संबंधित कथित आरोपांनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी (Mummaka Sudarshan) त्याची बदली पोलीस मुख्यालयात केली होती. मात्र त्यानंतरही त्याच्या विरोधातील तक्रारी कायम राहिल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सलग चौथ्या दिवशी श्रीरामपूर कडकडीत बंद
वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध तसेच हॉटेल व्यवसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरात सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. आज , बुधवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला.
Dhamaal 4 साठी मंगळवार ठरला दमदार! पाचव्या दिवशी कमाई 86.02 कोटी रुपयांवर
दरम्यान नागरिकांच्या या दबावानंतर पोलीस सक्रिय झाले असून पोलिसांच्या पथकाने संघटित गुन्हेगारी चालवणाऱ्या सोनू बेग याच्या सदनिकेवर छापा टाकून एक रिव्हॉल्व्हर, 2 काडतुसे, कागदपत्रे, कोरे धनादेश, एटीएम कार्ड जप्त केले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.