Sudhir Mungantiwar On OYO Hotel : राज्यातील OYO हॉटेल्समध्ये (OYO Hotel) रुम एकेक तासासाठी भाड्याने मिळत असल्याचा धक्कादायक आरोप राज्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे. तसेच या प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी माहिती घ्यावी अशी मागणी देखील विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात किती OYO हॉटेल्स आहेत आणि त्यात नेमकं काय घडत आहे याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. या हॉटेल्समध्ये एकेक तासासाठी भाड्याने रुम मिळत आहेत असा आरोप देखील या चर्चेदरम्यान बोलतना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. एक OYO नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे. शहराच्या 20-20 किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी OYO हॉटेल दिसत आहे. मनात शंका येत आहे की हे OYO हॉटेल चेन काय आहे. सरकारने या अतिशय गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या OYO हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही. असं या चर्चेदरम्यान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आग लावण्याचा प्रयत्न, भाषेला नाही सक्तीला विरोध; उद्धव ठाकरेंचा खासदार निशिकांत दुबेला प्रत्युत्तर…
या चर्चेदरम्यान पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या हॉटेल्समध्ये एकेक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ती कशासाठी दिले जाते? हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. OYO च्या हॉटेलमध्ये 20-20 किलोमीटर जाऊन कुणीही प्रवासी राहत नाही आणि जर प्रवासी तिथपर्यंत जात असेल तर त्याचं अर्थशास्त्र कच्च आहे. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणे जास्त परवडणार असं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच राज्यात किती OYO हॉटेल आहेत याची मागणी गृहराज्यमंत्र्यांनी घेणे आवश्यक आहे. असं देखील मुनगंटीवार म्हणाले.