Download App

भाजप आमदाराने भेसळयुक्त पनीरचा प्रश्न मांडला विधीमंडळात; बनावट अन् खरं पनीर कसं ओळखणार?

१० तारखेला प्रश्न लागला होता .एफडीएनं छापेमारी केली आणि त्यात पनीर सापडले होते जे आर्टिफिशिअल होतं. अधिकारी वर्ग नाही

  • Written By: Last Updated:

Vikram Singh Pachpute on Adulterated Paneer : भेसळयुक्त दुधाची चर्चा आपण कायम ऐकतो. त्यावरून महाराष्ट्रा विधीमंडळात आणि बाहेरही मोठी चर्चा झालेली आहे. आता पुढं आलेला प्रश्न आहे पनीर. (Paneer) ते फक्त पनीर नसून भेसळयुक्त पनीर. तो विषय पुढ आणलाय तो भाजप आमदार विक्रमसिंह पाचपूते यांनी. आपल्या अन्नातले 70-75 % पनीर कृत्रीम असल्याचं सांगत पाचपुते यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला.

नक्की प्रकरण काय?

राज्यात बनावट अन्नपदार्थांवरून अनेकदा चिंता व्यक्त होताना दिसतं. कारवायाही होतात. मात्र, कारवाई म्हणून केवळ गुन्हा दाखल करण्यापलीकडं काहीच कारवाई होत नाही. अन्न व औषध प्रशासनात अधिकारी वर्ग नसल्याने मोठी छापेमारी एफडीए करू शकत नसल्याचं आमदार विक्रमसिंह पाचपूते म्हणाले. माझी आज लक्ष्यवेधी आहे. सिंथेटिक पनीर विकलं जातं, यासंदर्भात परवानगी नाही आहे. याबाबत बोलणार असं ते म्हणाले होते.

बीड जिल्ह्यात भेसळयुक्त दूध निर्मितीवर कारवाई; पावडरच्या ६०० गोण्यांचा साठा जप्त, एकजण ताब्यात

चीज ॲनालॉग बनवण्याची परवानगी दिली आहे. अन्नात आपल्या आर्टिफिशिअल पनीर आहे. मी अध्यक्षांना हे पनीर द्यायला आणले आहे ७०-७५ टक्के पनीर आर्टिफिशिअल आहे, मला तज्ज्ञांनी सांगितलं. तुम्ही ओळखून दाखवा कोणतं पनीर खरं आहे. पोर्क लार्ड तिरुपतीच्या प्रसादात आलं होतं. प्रोटिन सोर्स पनीर नसून तो तेलाचा गोळा आहे. होळीचा सण आहे, अशात केटरींग मध्ये पनीर टिक्का बिर्याणी खातात. दुर्दैवानं टेस्टिंग करायचं म्हंटलं तर सोय नाही. आयोडिनची टेस्ट स्टार्च शोधण्यासाठी आहे.

१० तारखेला प्रश्न लागला होता .एफडीएनं छापेमारी केली आणि त्यात पनीर सापडले होते जे आर्टिफिशिअल होतं. अधिकारी वर्ग नाही त्यामुळे मोठी छापेमारी एफडीए करु शकत नाही.कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. भेसळयुक्त पनीर दिलं तर ब्रॅंडिंग संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतं यात बाकी काहीही होऊ शकत नाही. अशात कायद्यात बदल केला पाहिजे. हा जीवाचा प्रश्न आहे. गांभीर्याने विषय घ्यावा लागणार आहे, असंही पाचपूते म्हणाले.

follow us

संबंधित बातम्या