BJP MP Manoj Tiwari on Raj Thackeray : राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत राज ठाकेर यांनी मराठी समर्थनात हिंदी सक्तीच्या बाजूने असणाऱ्या किंवा करु पाहणाऱ्या अनेक नेत्यांना थेट झोडपून काढलं आहे. यावर आता भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. त्यांनी राज ठाकरेंसोबत जो जाइल, तो समाप्त होईल असं वक्तव्य केलं आहे.
हिंदीच्या मुद्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर भाजपच्या मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंव भाष्य केलं आहे. या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकता आहे, जा भाषिक एकता आहे, भाईचारा आहे ते तोडण्याचा प्रयत्न करणारा हा प्राणी आहे असं ते म्हणालेत.
Video : हिंदी भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लढतो?, राज ठाकरेंचा थेट फडणवीसांवर घाव
राज ठाकरेला ज्याला जे बोलायचे आहे ते बोलावे पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे त्याला पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. तसंच, यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करत नाही आणि जे राज ठाकरेसोबत जातील ते देखील महाराष्ट्रात समाप्त होतील. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषाच्या अस्मितेचे पालन भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीने करत आहे असंही ते म्हणाले.
त्यासोबतच इतका कोणताही मराठी माणूस संस्कृतीचा आदर करु शकत नाही. पण हे लोक तर मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत ते राज ठाकरे करतात. काल झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना थेट सुनावलं होतं. तुम्ही मुंबईत या. तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे डुबेकर मारेंगे असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे हा वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे.