BJP National President Nitin Nabins appointed Vinod Tawde as Election Incharge for Kerala Assembly Elections : पाच वेळा आमदार असणारे नितीन नबीन यांची बिनविरोध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. दुसरीकडे नितीन नबीन यांच्या त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून भाजप आसाम वगळता कोणत्याही राज्यात सत्तेत आलेला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर त्यांनी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विनोद तावडेंना दिली मोठी जबाबदारी
पक्षप्रमुख म्हणून नबीन यांना सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल, ज्यामध्ये पश्चिम बंगाल व्यतिरिक्त केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि आसाम यासारख्या राज्यांमधील निवडणुकांचा समावेश आहे. त्यामध्ये त्यांनी आगामी केरळ विधानसभा निवडणुकांची जबाबदारी महाराष्ट्र भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर दिली आहे. तावडे आता निवडणूक प्रभारी असणार आहेत. तर त्यांच्यासोबत सहप्रभारी म्हणून कर्नाटकमधील भाजप नेत्या शोभा करंदलाजे या असणार आहेत.
BJP @BJP4India National President Nitin Nabin Ji
has appointed Vinod Tawde@TawdeVinod as Election Incharge and Shobha Karandlaje as Co-Incharge for the upcoming Kerala Assembly Elections..! #KeralaElections #BJP pic.twitter.com/7ipUtvJsVo— Poll Diary (@poll_diary) January 21, 2026
नबीन यांचे सुरुवातीचे आव्हान
पक्षप्रमुख म्हणून नबीन यांना सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल, ज्यामध्ये पश्चिम बंगाल व्यतिरिक्त केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि आसाम यासारख्या राज्यांमधील निवडणुकांचा समावेश आहे. भाजप आसाम वगळता या राज्यांमध्ये स्वतःच्या बळावर सत्तेत येऊ शकलेला नाही. तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये, पक्ष मागील निवडणुकांपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच नबीन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंचायत ते संसदेपर्यंत भाजपचे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत पक्षाचे ध्येय निवडणुका जिंकणे नसून लोकांच्या दैनंदिन चिंतांशी खोलवर जोडलेले राहणे हे असले पाहिजे असं सांगितले आहे.
शहा-नड्डा यांच्या यशाचे रक्षण करण्याची जबाबदारी
तर दुसरीकडे नितीन नबीन यांच्यावर आता भाजपची तळागाळातील उपस्थिती टिकवून ठेवण्याचे आव्हान देखील असणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे देशातील अनेक ठिकाणी भाजप गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळेत तळागाळातील कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आणखी प्रयत्न करावी लागणार आहे. तसेच अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे कार्य यशस्वीरित्या पुढे नेण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे.
शरद पवारांसह ‘नगर’ मध्ये निलेश लंके यांची जादू संपली? राजकारणातील प्रवास अवघड
2014 पासून केंद्रात भाजप सत्तेत असून अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी पक्षप्रमुख म्हणून पक्षाला नवीन उंचीवर नेले आहे मात्र आता दोन्ही नेते केंद्रात केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या दोन्ही पूर्वसुरींच्या सावलीपासून दूर जाणे, स्वतःची ओळख निर्माण करणे आणि त्यांचा यशाचा दर टिकवून ठेवणे ही जबाबदारी नितीन नबीनवर आहे.
