Chandrashekhar Bawankule on Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आक्रमकपणे लढा देणारे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली (Bawankule) आणि राज्यात एकच खळबळ उडाली. ही बातमी खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच फोडली त्यामुळे अनेक अंगाने चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान, बावनकुळेंच्या या खुलाशावर स्पष्टीकरण देता देता आमदार धसांना नाकीनव आलेत अशी स्थित आहे. आज बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
भाजपने आमदार सुरेश धस यांना शांत राहायला सांगितलय असा थेट प्रश्न माध्यामांनी विचारला असता, बावकुळे म्हणाले तुम्हला कुणी सांगितलं की त्यांना शांत राहायला सांगितय? असं काहीही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्ष म्हणून पूर्णपणे सुरेश धस यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी फडणवीसांचं पाठबळ आहे. त्यामुळे धस हे आक्रमकपणे लढत आहेत आणि लढत राहतील. त्यांनी कुणीही थांबवलं नाही आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत त्यांनी कुणी थांबवणारही नाहीत असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
बावनकुळेच धस अन् मुंडेंमध्ये सेटलमेन्ट करत होते? धसांनी खरे सांगूनच टाकले
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?
धनंजय मुंडे आणि सुरेश धस दोघेही इमोशनल आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
धनंजय मुंडेंच्या ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी भेटलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात गैर नाही.संतोष देशमुख प्रकरण व तब्येतीची विचारपूस करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परवाच्या दिवशी भेटलो…भेटीनंतर बाहेर आल्यावर काय केलंय, हे तुम्हाला माहिती आहे. मुंडेंना रात्रीचं त्यांना दवाखान्यात नेले होते. मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं व न घेणं याचा अधिकार अजित पवारांचा आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. तसेच माझा लढा सुरुच राहणार