Download App

BJP Vs NCP : पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर

पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर सुरु झालंय. भाजपकडून शरद पवार साहेब तुम्हाला सत्य आणि असत्याबद्दल बोलण्याचा अधिकारच नसल्याचा टोला लगावण्यात आलाय. तर राष्ट्रवादीकडूनही भाजपच्या या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलंय. दोन्ही पक्षांचे ट्विट पाहता शाब्दिक युध्द झाल्याचं दिसून येत आहे.

भाजपच्या या नव्या ट्विटमुळे नवा वाद सुरु झाला असून भाजपने ट्विटमध्ये म्हंटल की, “मा. पवार साहेब, खर तर, ‘सत्य – असत्य’ बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, पवार साहेब, तुम्ही राजकारणात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमीच खोट्याचा आधार घेत इथपर्यंत आलात, तुमचा इतिहास हेच सांगत आहे की, “तुम्ही सहकाऱ्यांचा विश्वासघात करूनच स्वतःला सिद्ध केलंत.” असा टोला भाजपने लगावला आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन हे ट्विट केलंय.

बाळासाहेब थोरातांनी दिले सत्यजित तांबेंना काँग्रेसमध्ये परत येण्याचे संकेत

काय म्हणाले फडणवीस?
पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच झाला होता. आम्ही सरकार बनवण्याची सर्व कवायत पूर्ण केली. म्हणजे खातेवाटप कसं असणार, पालकमंत्री कोणाला मिळणार या सर्व गोष्टी अंतिम झाल्या होत्या आणि हे सर्व अजित पवारांशी नाही तर शरद पवारांशी बोलणं झालं होतं.

Balasaheb Thorat अखेर त्या वादावर बोलले.. माझा हात नीट असता तर…

शरद पवारांची प्रतिक्रिया :
मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नव्हतं.

फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर या नव्या वादाला सुरुवात झाली असून त्यानंतर भाजपकडून अशा प्रकारे ट्विट करण्यात आलंय. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही भाजपला उत्तर देण्यात आलंय. “पवार साहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाला तुमच्या पोचपावतीची गरज नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका लढत आहात ते तुमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांना जाहीर व्यासपीठावरून आपला गुरु म्हणतात आणि मानतात, याचा विसर पडला असेल तर रोज सकाळी बदाम खा”, असा सल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.

Tags

follow us