Balasaheb Thorat अखेर त्या वादावर बोलले.. माझा हात नीट असता तर…

Balasaheb Thorat अखेर त्या वादावर बोलले.. माझा हात नीट असता तर…

अहमदनगर : संपूर्ण भारतात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सगळ्यात चांगली महाराष्ट्रात झाली. सत्यजितने (satyajeet tambe) त्यात खूप काम केलं. पण सत्यजित काही असेल तरी तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये (congress) तू राहिला एकटा. तुलाही काँग्रेसशिवाय करमायचे नाही. त्यांनाही करमायचे नाही आणि काँग्रेसला करमायचे नाही. त्यामुळे काळजी करू नको. काय होणार शेवटी, असे म्हणतं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित तांबेंना काँग्रेसमध्ये परतण्याचे आवाहन केलं.

सत्यजित तू विजयी झाला ही मेहनत डॉ. सुधीर तांबे आणि त्याचे कष्ट आहेत. जे काम त्यांनी केले ते तू चांगल्या रीतीने पुढे न्यावे ही अपेक्षा मी करतो, असे थोरात म्हणाले. ते पुढं म्हणाले, मी एक पत्र लिहिलं. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत मला जे वाटलं ते पक्षश्रेष्ठींना कळवले. जी काही व्यथा होती कथा होती ती सांगितली आणि तुम्हाला ऑनलाईन सांगितली. सत्यजित म्हणतोय तांत्रिक चूक झाली पण माझा हात नीट असता तर ती तांत्रिक चूक होऊन दिली नसती. मी नाशिकला राहिलो असतो, असा अप्रत्यक्ष टोला नाना पटोले यांना लागवला आहे.

अनेक ठिकाणी काय उद्योग सुरू आहेत. ते आम्हाला सगळ ठाऊक आहेत. कशात राजकारण करावे कशात करू नये, महाराष्ट्राचे मंत्री आहेत तसे वागावे ही अपेक्षा आहे. नगर जिल्ह्याला त्रास दिला जात आहे. ही दहशत जास्त दिवस राहणार नाही. जिल्हा खपवून घेणार नाही, ही गोष्ट समजून घ्या, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.

अलीकडच्या कालखंडात आपले शेजारचे मंत्री आहेत. त्यांना आपल्या शिवाय करमत नाही. कुठेही गेले तरी मी त्यांच्या बरोबर असतो. अनेक विषय घेऊन बोलतात. त्रास होतोय कार्यकर्त्यांना. फार काळ हा त्रास सहन करावा लागणार नाही. जिद्दीने लढू, अशी टीका बाळासाहेब थोरात यांची विखे पाटील यांच्यावर केली.

फडणवीसांची नवी गुगली.., राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मी जी मांडणी केली त्यांची दिल्लीने दखल घेतली. काल एच. के. पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. आपला विचार हा काँग्रेसचा विचार आहे. वेगळा विचार असू शकत नाही. त्या विचाराने काम करत राहणार आहोत. पण कधी कधी त्यामध्ये मतभेद होतात. जे काही असेल ते पक्षाअंतर्गत आहेत आणि पक्षाअंतर्गत सोडवले पाहिजे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube