सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील

जयंत पाटील यांच्या रणनीतीमुळे आघाडीची गणितं अचूक जुळून आली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.

Untitled Design 40

Untitled Design 40

BJP’s correct program by Jayant Patil in Sangli Zilla Parishad : सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत महाविकास आघाडीने निर्णायक विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. जयंत पाटील यांच्या रणनीतीमुळे आघाडीची गणितं अचूक जुळून आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.

61 सदस्यांच्या सभागृहात सत्तेसाठी 31 सदस्यांचे बहुमत आवश्यक असताना महाविकास आघाडीकडे सुरुवातीला 30 सदस्य होते. मात्र अजित पवार यांच्या गटातील 6 सदस्यांचा कल आघाडीकडे झुकल्याने आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. दुसरीकडे भाजप व मित्रपक्षांकडे 18, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 7 सदस्य असल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले.

ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

आघाडीतील फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले. वाळवा तालुक्यातून संगीता पाटील यांचं नाव पुढे आलं आणि अखेर त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर पलूस तालुक्यातील काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीत गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. भाजपने अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

शिवसेनेकडून शीतल बाबर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती, तर भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी जयराज पाटील यांना संधी देण्यात आली होती. तसेच भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने महायुतीत अंतर्गत मतभेद उघड झाले. अखेर सर्व राजकीय घडामोडींना पूर्णविराम देत महाविकास आघाडीने सांगली जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली. या विजयामुळे जिल्ह्यात आघाडीची ताकद अधिक मजबूत झाली असून राज्याच्या राजकारणातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version