Download App

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, वाचा काय अन् कसं घडलं?

अक्कलकोट येथे मोठी घटना घडली आहे. येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे.

  • Written By: Last Updated:

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे. (Sambhaji Brigad) प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवीण गायकवाड हे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते. तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडं आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त असल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्याला नाही अक्कल, त्याचं नाव गोपीचंद पडळकर;त्या वक्तव्यावरुन संभाजी ब्रिगेडने वचपाच काढला

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचंदेखील ते म्हणाले. त्या गोष्टीचाच राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.

प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. एकूण दोन संभाजी ब्रिगेड आहेत. गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रभर दौरे करत असतात. ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असतानाच शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासण्यात आले.

follow us