सामाजिक आणि राजकीय संभाजी ब्रिगेड एकत्र येणार; प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाडांची मोठी घोषणा

Praveen Gaikwad : संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय एकत्र येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) राजकीय आणि सामाजिक एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, माझ्यावर हल्ला झाला यामुळे संरक्षण घ्यावं असं शरद पवार याचं म्हणणं होतं. मला पोलिस संरक्षण मिळालं आहे. जो संषर्घ निर्माण झाला त्याची माहिती शरद पवार यांना दिली. माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मराठा सेवा संघाची बुलढाणा, चिखली येथे बैठक झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, महात्मा फुले येथील संशोधक मंडळ आणि सहकार प्रस्थिती यासह बत्तीस संघटना एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला असं माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले.
राजकीय आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड एकत्र येणार, प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड #sambhajibrigade #marathasevasangh #Maharashtra pic.twitter.com/mUUvxhpyQr
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 2, 2025
तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. “ताकद विभागल्यामुळे ना राजकीय यश मिळतंय, ना सामाजिक आपला दबाव राहतोय, असे या एकत्रीकरणामागील प्रमुख कारण आहे. संभाजी ब्रिगेडचा मूळ उद्देश सांस्कृतिक आणि सामाजिक दबाव निर्माण करणे हा होता, तसेच ती राजकारण विरहीत संघटना होती. आता मराठा सेवा संघ राजकारणात जायचे की समाजकारणात, याचा निर्णय घेईल. राजकीय यश मिळवण्यासाठी संभाजी ब्रिगेडला आजपर्यंत यश न मिळाल्याने यावर पुनर्विचार होऊ शकतो.
निवडणुकीत सरकारी गाड्यातून पैसे आले; भाजपमध्ये प्रवेश करताच कैलास गोरंट्याल यांचा धक्कादायक खुलासा
प्रवीणदादा गायकवाड आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील समीकरण पुढे कसे राहील, यावरही चर्चा झाली. मी संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष नसलो तरी एक प्रमुख नेता म्हणून कार्यरत राहीन, असे स्पष्ट करण्यात आले. पुरुषोत्तम खेडेकर यांनी 2005 मध्ये मराठा सेवा संघाचा राजीनामा दिला असला तरी ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत. मला पोलिस संरक्षण मिळाले असून, बहुजन समाज माझे संरक्षण करण्यास समर्थ आहे, परंतु लोकशाहीतील व्यवस्थेनुसार हे संरक्षण देण्यात आले आहे. असेही माध्यमांशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले.