त्याला माझे हातपाय तोडताना पाहायचं होतं; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Shivraj Bangar : माजी धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांचंही मंत्रिपद गेलं आहे. ते पुन्हा मिळणार अशाही चर्चा आहेत. (Bangar) असं असतानाच आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. तसंच, वाल्मिक कराड याला माझे हातपाय तोडताना लाईव्ह पाहायचं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवराज बांगर यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या संदर्भातील धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. वाल्मिक कराड याने माझ्या खुनाची सुपारी दिली होती. त्याला माझे हातपाय तोडताना लाईव्ह पाहायचं होतं. ज्याला सुपारी दिली त्या सनी आठवले याने माझा खून केला नाही. त्यामुळे त्या सनी आठवलेला खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलय असाही थेट आरोप बांगर यांनी यावेळी केला आहे.
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती, बाळा बांगर यांचा गंभीर आरोप
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे खुन प्रकरणानंतर आता सरपंच बापू आंधळेंचा खूनदेखील वालिमीक कराड याच्या सांगण्यावरूनच झाला आहे, असंही बांगर यांनी म्हटलं आहे. तसंच, वालिमीक कराड हा प्यादा आहे. वाल्मिक कराडच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांची ताकद होती. त्चया ताकदीने हे सर्व करून घेतलेलं आहे. त्यामुळे मेरी कोई गलती नही, असं धनंजय मुंडे म्हणू शकत नाहीत, असा आरोप बांगर यांनी केलाय.
बापू आंधळेंची हत्या गोट्या गीते आणि गँगने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केली. त्या गुन्ह्यामध्ये महादेव गितेला गोळ्या घातल्या तो जेलमध्ये आहे. विधानसभेला बबन गीते अडवा येईल म्हणून ही हत्या केली, असा आरोप करच एसआयटी नेमून बापू आंधळे खून प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवराज बांगर यांनी यावेळी केली आहे.