माजी मंत्री धनंजय मुंडेंचा एफआयआर व्हायरल; गाडी पेटवली अन् दरवाजे उघडू दिले नाही

माजी मंत्री धनंजय मुंडेंचा एफआयआर व्हायरल; गाडी पेटवली अन् दरवाजे उघडू दिले नाही

Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही अडचणी थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यातच त्यांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. (Deshmukh) धनंजय मुंडे यांनीच आरोपींना पोसलं, गुन्हा केल्यानंतर फरार होण्यास मदत केली आणि पैसे पुरवले असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तर, देशमुख कुटुंबियांनी नाव न घेता मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.

शिवराज बांगर यांचा एक जुना एफआयआर व्हायरल झाला होता. त्यामध्ये बांगर यांनी वाल्मिक कराडकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण होतं. त्यावर शिवराज बांगर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता धनंजय मुंडेंचा २००७ मधला एक एफआयआर व्हायरल झला आहे. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचंही नाव आहे. किशोर फड यांना गाडीमध्ये कोंडून जाळण्याचा प्रयत्न केल्याचं हे प्रकरण आहे.

धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या जास्त आहारी गेले; यांच्या आई मूळगावी गेल्या त्या आल्याच नाहीत -धस

१८ एप्रिल २००७ चा FIR व्हायरल झाला असून या व्हायरल होत असलेल्या FIR सोबत एक मॅसेज देखील व्हायरल होतोय. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं यात म्हटलं आहे. सन 2007 मध्ये किशोर फड याला जीवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत असंही नमूद करण्यात आलेलं आहे.

भंगारचं टेंडर घेण्यावरुन धनंजय मुंडे आणि किशोर फड यांच्यात वाद झाला होता. किशोर फड यांच्या मेव्हण्याच्या स्कॉर्पिओ गाडीवर पेट्रोल टाकून ती जाळण्यात आली. आतमध्ये किशोर फड होते. आरोपींना गाडीचा दरवाजा बाहेरुन दाबून धरला होता. मात्र गाडीचा स्फोट झाल्याने बाकीचे लोक पळून गेले, त्यामुळे ते गाडीतून बाहेर पडू शकले, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे धनंजय मुंडेंच्या बाबतीत नवनवे खुलासे होत असताना दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याने मारहाण केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर आमदार प्रकाश सोळंके यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर संदीप क्षीरसागर यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. तहसीलदार डोके यांना धमकी दिल्याचं हे प्रकरण आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube