धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या जास्त आहारी गेले; यांच्या आई मूळगावी गेल्या त्या आल्याच नाहीत -धस

धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या जास्त आहारी गेले; यांच्या आई मूळगावी गेल्या त्या आल्याच नाहीत -धस

Suresh Dhas Dhananjay Munde : भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच, त्यांच्या एकंदर राजकीय जिवनावर भाष्य केलं आहे. (Suresh Dhas) धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते, की धनंजय मुंडेंच्या घरातले लोकसुद्धा त्यांच्यावर यामुळे नाराज असतील. त्यांच्या आई तर दीड वर्षांपासून मूळगावी नाथ्रा येथे गेलेल्या आहेत, अजून आल्या नाहीत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.

सुरेश धस म्हणाले की, आकाच्या वागण्यामुळे धनंजय मुंडेंना मित्रच राहिलेला नाही. बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंचे मित्रच होते. आम्ही पंकजाताईंना लोकसभेत निवडून देण्यासाठी खूप कष्ट घेतले. बजरंग सोनवणेंचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. सोनवणे हे शरद पवारांकडे गेले नसते तर आमचा पराभव झाला नसता. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे डावपेच माहिती असलेला माणूस तिकडे गेल्याने पंकजा मुंडेंचा पराभव झाला.

धनंजय मुंडेंच्या रिक्त खात्याचा मंत्री कोण? अजितदादांनी कुणाला दिली खुर्ची; वाचा निर्णय..

धस पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या पूर्ण आहारी गेले होते. मुंडे जिल्ह्यात आले की सगळं इव्हेंट मॅनेजमेंट बघायचं, पाहिजे ते द्यायचं.. ते आले की कुणाचीही भेट होऊ द्यायची नाही, सगळ्यांना बाजूला करुन एकट्यानेच बोलायचं. धनंजय मुंडेंनाही हवं ते सगळं मिळत होतं म्हणून ते खूश होते.

”मला वाटतं धनंजय मुंडेंच्या घरातले सदस्यही वाल्मिक कराडवर नाराज असतील. धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ, पत्नी यामुळे नाराज असतील. कारण वाल्मिक कराड कुणाचंच काही चालू देत नव्हता. धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षांपासून नाथ्रा (मूळ गाव) येथे रहायला गेल्या आहेत, त्या अजून आलेल्या नाहीत. त्यांच्या घराची दुरुस्तीच झालेली नाही.. असं हे वागत होते. मित्र म्हणून कार्यकर्ता म्हणून कुणावर किती जबाबदारी सोपवायची, हे धनंजय मुंडेंना कळलंच नाही. त्यामुळे प्रचंड रोष धनंजय मुंडेंवर निर्माण झाला आहे.” असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला. ते

धस पुढे म्हणाले, जरी मी मुंडेंना भेटलो असलो तरी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भ्रष्टाचाराचं पत्र दिलं होतं. धनंजय मुंडे यांचा मला रागही येतोय आणि कीवही येतेय. काय होतास तू काय झालास तू.. राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.. एवढा मान त्यांना पक्षाने दिला होता. २०१९ पर्यंत ते फार चांगले वागत होते. नंतर कुणीकडचे कुणीकडे गेले. कशासाठी? दुर्दैवाने त्यांचा सहभाग या प्रकरणात ते असू नये. ते आरोपी होतील, असं मला अजून वाटत नाही. सीडीआरमध्ये ते कुठे सापडू नयेत, एवढीच प्रार्थना आहे. सापडले तर आकांच्या शेजारी जातील, हे मात्र नक्की

follow us
  • fb
  • instagram
  • youtube