लक्ष्मण हाकेचं रिचार्ज परळीहून होतंय’; शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगरांचे वेगळेच गणित

Shivraj Bangar of On Laxman Hake : महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. त्यासाठी ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील मुंबईमध्ये लाखो समर्थकांसह दाखल होणार आहेत. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी संताप व्यक्त केला आहे. तर लक्ष्मण हाके यांच्यावर शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी टीका केलीय.
जरांगेंविरोधात सदावर्ते मैदानात! मुंबईकडे कूच करण्याआधीच गुन्हा दाखल करून अटकेची केली मागणी
राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील प्रवक्ते व नेते शिवराज बांगर यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाकेचं रिचार्ज परळीहून होतंय. तर लक्ष्मण हाके हा राजकारणातला राखी सावंत आणि त्याहीपुढे जाऊन हा राजकारणातला उर्फी जावेद आहे अशी बोचरी टीका शिवराज बांगर यांनी केली आहे.
शरद पवारांवरती टीका म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं
शिवराज बांगर पुढे टीका करताना म्हणाले की, “लक्ष्मण हाकेचा राजकीय आवाका आणि ओबीसींसाठीचे योगदान पाहता त्याला फार काही महत्त्व द्यावं अशी त्याची परिस्थिती नाही. मराठा समाज उस्फुर्तपणे जरांगेंच्या पाठीमागे उभा आहे. कोणी जरांगे पाटलांना स्पॉन्सर करावं एवढं काही ते आंदोलन लहान नाहीये. लक्ष्मण हाकेंला कोण स्पॉन्सर करतंय हे अख्या महाराष्ट्राने पाहिलंय. लक्ष्मण हाके यांना पैसे घेताना लोकांनी पाहिलंय, ओबीसींच्या इतर नेत्यांवर टीका करताना लोकांनी पाहिलंय, असंही शिवराज बांगर म्हणाले. ”लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवरती टीका करणे हे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. हे उद्योग लक्ष्मण हाकेंनी करू नयेत ही त्यांना माझी विनंती आहे” अशी बोचरी टीकाही शिवराज बांगर यांनी केली.
मोठी बातमी! लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडच्या गेवराईत दगडफेक, वातावरण चिघळलं, वाचा काय घडलं?
लक्ष्मण हाके राजकारणातला उर्फी जावेद
पुढे शिवराज बांगर यांनी लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवरती टीका करणे हे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. हे उद्योग लक्ष्मण हाकेंनी करू नयेत ही त्यांना विनंती आहे. लक्ष्मण हाके हे काही ओबीसीचा नेता नाही. लक्ष्मण हाकेंच्या बैठकीला शंभरपेक्षा कमी लोक होते. त्यामध्ये 80 टक्के लोक हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बचाव गॅंगचे होते. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी ज्यांनी मोर्चे काढले उपोषण केले ते लोक या बैठकीत होते. लक्ष्मण हाकेचं जे रिचार्ज आहे ते परळीहून होतं. लक्ष्मण हाके हा राजकारणातला राखी सावंत आहे. त्याहीपुढे जाऊन लक्ष्मण हाके हा राजकारणातला उर्फी जावेद आहे,” अशी गंभीर टीका शरद पवार गटाचे शिवराज बांगर यांनी केली आहे.
मराठा-ओबीसी, ओबीसी-ओबीसी मध्ये वाद लावू नये
शिवराज बांगर म्हणाले की, “माझी विजयसिंह पंडित यांना विनंती आहे प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला सोडून दिलं पाहिजे. मराठा-ओबीसी आणि ओबीसी-ओबीसी मध्ये वाद लावायचं काम लक्ष्मण हाकेंनी करू नये. हा माणूस बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आलेला आहे. त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि त्याला बीडमध्ये येण्यास बंदी घालावी अशी प्रशासनाला माझी विनंती आहे,” अशी मागणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केली आहे.