तरुणीवर अत्याचार अन् व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; माजी महापौर अभिषेक कळमकरांवर गुन्हा दाखल

Abhishek Kalamkar : नगर शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात

Abhishek Kalamkar

Abhishek Kalamkar

Abhishek Kalamkar : नगर शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात पंचवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कळमकर यांनी तिला संपर्कात ठेवले. त्यानंतर नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पिडितेने सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासनतास त्रास देत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावेही पीडितेने पोलिसांकडे जमा केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस…, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी-

माजी महापौर कळमकर फरार

पोलिसांकडून माहिती मिळाली की, गुन्हा दाखल होताच माजी महापौर कळमकर (Abhishek Kalamkar) फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नगर शहरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड

Exit mobile version