Dadabhau Kalamkar : पवारांचे विश्वासू कळमकर यांच्या हाती जिल्हाध्यक्ष पदाची धुरा
Dadabhau Kalamkar : अहिल्यानगर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यांमध्ये उलताफलस सुरू असतानाच अहिल्यानगर
Dadabhau Kalamkar : अहिल्यानगर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यांमध्ये उलताफलस सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदाची धुरा ही शरद पवारांचे निकटवर्तीय व विश्वासू समजले जाणारे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार (NCPSP) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कळमकर यांना नियुक्तीपत्र दिले आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीची तारीख जाहीर केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून आता जोरदार मोर्चे बांधणी ही सुरू झालेली आहे मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला.
जिल्हाध्यक्ष राहिलेले राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) यांनी आपल्या पदाचा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव दिला असल्याचे म्हणत पक्षाला रामराम केला. आगामी निवडणुकांपूर्वी शरद पवारांना हा धक्काच मानला जात होता त्यामुळे या जागेवरती कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं होतं अखेरीस शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे व निकटवर्ती असलेले माजी आमदार दादाभाऊ कळमकर (Dadabhau Kalamkar) यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला मोठी गळती लागलेली आहे. यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष बांधणीसाठी तसेच संघटन मजबुतीकरण या सर्व गोष्टींची जबाबदारी आता दादाभाऊ कळमकर यांच्यावर आहे. राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची कामगिरी कशी राहील हे येणाऱ्या काळा त समजेल मात्र पक्ष पुन्हा उभारणीसाठी कळमकर यांना मोठे प्रयत्न करावे लागणार हे मात्र नक्की नक्की.
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ केदार शिंदे घेऊन येत आहेत तुमच्या आमच्या घरातली गोष्ट
दादाभाऊ कळमकर यांच्या विषयी जाणून घ्या
पारनेर तालुक्यातील छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात दादा कळमकर यांचा जन्म झाला. राजकारणाची आवड असलेल्या दादा यांनी राजकारणात प्रवेश केला. 1985 मध्ये त्यांना नगर शहरातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवत इतिहास घडवला. दरम्यान राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर तब्बल बारा वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळून पक्ष संघटना मजबूत करण्यात मोठे योगदान दिले.
