फळं अन् भाज्यांवर झुरळांचा सुळसुळाट, मुंबईत Blinkit स्टोअरवर FDAची कारवाई

Blinkit Licence Suspended In Mumbai Blinkitवरून काही मिनिटांत घरपोच किराणा, फळं, भाज्या किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Blinkit Facility Licence Suspended In Mumbai

Blinkit Facility Licence Suspended In Mumbai

Blinkit Facility Licence Suspended In Mumbai : Blinkitवरून काही मिनिटांत घरपोच किराणा, फळं, भाज्या किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील मालाड पश्चिम येथील Blinkitच्या एका डार्क स्टोअरमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या सुविधेचा फूड लायसन्स तात्काळ निलंबित केला आहे.

फळे आणि भाज्यांवर झुरळांचा सुळसुळाट

7 ऑगस्ट रोजी FDAच्या अधिकाऱ्यांनी मालाड पश्चिमेतील रामचंद्र लेन येथील Blinkitच्या डार्क स्टोअरची तपासणी केली. या तपासणीत स्टोअरची अवस्था अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळले. साठवून ठेवलेल्या फळे आणि भाज्यांवर झुरळे फिरताना आढळली. याशिवाय मुदत संपलेला खाद्यसाठा आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटीही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या.

घरपोच येणारा माल कुठून येतो, याकडे लक्ष देणं गरजेचं

Blinkitसारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहक काही मिनिटांत फळं, भाज्या, दूध, ब्रेड, स्नॅक्स आणि इतर खाद्यपदार्थ ऑर्डर करतात. त्यामुळे हे पदार्थ ज्या डार्क स्टोअरमध्ये साठवले जातात, तिथली स्वच्छता आणि साठवणूक अत्यंत महत्त्वाची ठरते. मालाडमधील तपासणीत आढळलेल्या परिस्थितीमुळे खाद्यपदार्थ दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता FDAच्या कारवाईतून समोर आली आहे. FDAने संबंधित सुविधेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. त्यामुळे निलंबनाच्या काळात या ठिकाणाहून खाद्यपदार्थांची विक्री किंवा वितरण करता येणार नाही.

संपूर्ण Blinkit बंद झालेलं नाही

दरम्यान, FDAची ही कारवाई केवळ तपासणी करण्यात आलेल्या मालाड पश्चिमेतील डार्क स्टोअरपुरती मर्यादित आहे. त्यामुळे संपूर्ण Blinkitच्या खाद्य व्यवसायाचा परवाना निलंबित करण्यात आलेला नाही. इतर ठिकाणी Blinkitच्या व्यवसायावर या आदेशाचा थेट परिणाम होत नाही.

Relianceच्या स्टोअरमध्येही काजू कतलीवर संशय

दरम्यान, बुलढाण्यातील Reliance Retailच्या एका स्टोअरवरही FDAने कारवाई केली आहे. ग्राहकाने काजू कतलीमध्ये बुरशी आणि जिवंत कीटक आढळल्याची तक्रार केली होती. तक्रारीतील बॅच स्टोअरमध्ये सापडला नाही. मात्र संबंधित दुसऱ्या बॅचमधील 11.34 किलो काजू कतली, किंमत 10,238 रुपये, FDAने जप्त केली असून तिचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

FDAचा मोठा अॅक्शन मोड

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत FDAने तब्बल 14,378 किलो/लिटर दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या जप्त मालाची किंमत सुमारे 93.26 लाख रुपये आहे. त्यामुळे Blinkitवरून फळं, भाज्या किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांनी घाबरण्याची गरज नसली, तरी सामानाची पॅकिंग, एक्सपायरी डेट, खराब झालेला माल किंवा संशयास्पद वास/दिसणं आढळल्यास तो पदार्थ वापरण्यापूर्वी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Exit mobile version