राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने पाटी कोरी; नाराजी दूर होताच रामदास आठवलेंची फटकेबाजी

Ramdas Athawale On Raj Thackeray :  संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या मुंबई महानगरपालिकेकडे लागले असून मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी

Ramdas Athawale On Raj Thackeray

Ramdas Athawale On Raj Thackeray

Ramdas Athawale On Raj Thackeray :  संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या मुंबई महानगरपालिकेकडे लागले असून मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युतीची घोषणा केली आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे तयार झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे आता मुंबई महापालिकेसाठी (BMC Election) प्रचाराची सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राज ठाकरे यांची पाटी कामाच्या नावाने कोरी असते अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. रामदास आठवले यांनी एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक्सवर लिहिले आहे की, राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला 600-700 लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही, आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही ? ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार  नाही तुमची पणती! असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक्सवर म्हटले आहे.

ZP Election 2026 : लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान ?

तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपादरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने रामदास आठवले यांच्या  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला समाधानकारक जागा न मिळाल्याने रामदास आठवले नाराज झाले होते. त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता मात्र यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रामदास आठवले यांनी राज्यातील महामंडळे, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला सन्मानजनक व न्याय्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version