Video : देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आहे अन् मरेल…; राज ठाकरेंना थेट प्रत्युत्तर
Devendra Fadnavis On Shivsena - MNS Alliance : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला
Devendra Fadnavis On Shivsena – MNS Alliance : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून ठाकरे बंधूंनी एकत्र येत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा केली आहे. मनसे आणि शिवसेना यांच्यात झालेल्या युतीनंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे बदलली असल्याने यावेळी मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे मनसे आणि शिवसेना युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या युतीची टिंगल उडवली आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी सहज टीव्ही बघत होतो. त्यावेळी काही माध्यमं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होती की, जणूकाही रशिया- युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि युती झाली. कुठल्याही एकाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच हे दोन्ही पक्ष करत आहेत. या दोन्ही पक्षांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे केले आहे. त्यापलीकडे या सगळ्याचा फार काही अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. यामुळे फारकाही परिणाम (Shivsena – MNS Alliance) होईल असे वाटत नाही असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माध्यमांशी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारे या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवायचे काम केले आणि पाप केले आहे, त्यामुळे मराठी माणूस त्यांच्यासोबत नाही. मुंबईत यांच्यासोबत यायला कोणीही तयार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की भावनिक बोलायचे पण जनता आता या भावनिक बोलण्याला भुलणारी नाही. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचे काम बघूनच मतदान करतील असं देखीस यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रश्मिका मंदाना स्टारर ‘मायसा’ चित्रपटाचा पहिला ग्लिम्प्स प्रदर्शित; चाहत्यांमध्ये वाढला उत्साह-
तर दुसरीकडे आज राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेसाठी युती घोषणा केली आहे. तसेच राज्यातील इतर महापालिकेत देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असून याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंकडून देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षाला किती जागा मिळाल्या आहे याबाबत कोणतीही माहिती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरत आहे.त्यात ते अल्लाह हाफीज म्हणत आहेत.त्यांनी मला या गोष्टी सांगू नये. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत.ते काय बोलतील त्यावर मी व्हिडीओ लावणार असल्याचा इशारा राज ठाकरे दिला. त्यावर बोलताना फडणवीसांनी आजकाल कसलेही व्हिडिओ बनवता येतात. पण मी एक गोष्ट सांगतो, अख्या दुनियेला माहितीय की, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आहे आणि मरेल हिंदुत्ववादी म्हणून.
