Devendra Fadnavis Prediction Of Raj Thackeray : यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर ते इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, मी आज भविष्यवाणी करतो. निकाल आल्यानंतर तुम्ही पाहा, असा दावाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. महानगरपालिका निवडणुकांची तारीख जशी-जशी जवळ येऊ लागली आहे तसं-तसे राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र केल्या आहेत. त्यात ठाकरे बंधूंची युती झाल्याने मुंबईच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांसह सर्वच राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात, फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या विशेष करून राज ठाकरेंचं राजकीय भवितव्यावर केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ही भविष्यवाणी केली आहे.
Pune Politics : अजित पवारांना घेरता घेरता, दादांनी लावला भाजपचेच मोहरे पळवण्याचा सपाटा
राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील
यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर ते इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, मी आज भविष्यवाणी करतो. निकाल आल्यानंतर तुम्ही पाहा, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्याला काहीच अर्थ उरलेला नसून, जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते तर, आजची राजकीय परिस्थिती वेगळी पाहायला मिळली असती असेही फडणवीस म्हणाले. जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे तर, या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे.
उद्धव ठाकरेंना फायदा होईल पण…
यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही. या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते. पण विचारांचा वारसा मिळत नाही. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाहीय, अशी टीकाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
