पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सद्दश्य वस्तू ठेवणारा ताब्यात; नागपूरमध्ये महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

Bomb in Pune arrested Maharashtra ATS पुणे येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याप्रकरणी महाराष्ट्र ATS ने संशयिताला अटक केली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय (3)

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय (3)

Bomb-like object kept in hospital in Pune arrested Maharashtra ATS major operation in Nagpur : पुणे येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू आढळल्याप्रकरणी दोन दिवसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी संशयिताला अटक केली. हा संशयित नागपूर रेल्वे जंक्शनवरून ताब्यात घेण्यात आला असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.

जानकरांचा केला पाळणा; कांदा आंदोलन चिघळल, शेट्टी, राऊत पोलिसांच्या ताब्यात

ATS च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव शिवाजी राठोड असे आहे. त्याला नागपूर रेल्वे जंक्शनवरून पकडण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, या कटामागे आणखी काही व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भजनात तल्लीन, समाजजागृतीचा संदेश सुरू आणि अचानक कोसळले; रामधन महाराजांच्या निधनाने बंजारा समाज शोकसागरात

बुधवारी संध्याकाळी उषाकिरण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथील पहिल्या मजल्यावरील पुरुषांच्या स्वच्छतागृहात टाइमरसह कमी क्षमतेच्या स्फोटकासारखी वस्तू आढळली होती. रुग्णालयाचे मालक डॉ. विलास गायकवाड यांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे 7 वाजता एका महिला कर्मचाऱ्याच्या नजरेस ही संशयास्पद वस्तू पडली.

निकालाच्या विलंबावरून केलेली टीका भोवली; सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला फटकारलं

डॉ. गायकवाड यांनी तत्काळ ती वस्तू एका बॉक्समध्ये ठेवून रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत हलवली आणि काही मिनिटांत पोलिसांना माहिती दिली. “त्या वस्तूला वायर जोडलेल्या होत्या, जेलॅटिनसारख्या कांड्या होत्या आणि टाइमरवर 7.10 अशी वेळ दिसत होती,” असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तींविरोधात स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोजशाळा परिसराला मंदिराचा दर्जा; उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, पुणे शरह पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. तपासादरम्यान रुग्णालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात शिवाजी राठोड दिसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.तपासात पुढे उघड झाले की, राठोडने हडपसरजवळील मंजरी परिसरात भाड्याने दुकान घेतले होते. पोलिसांनी गुरुवारी त्या ठिकाणी तपास केला असता तो फरार झाल्याचे समोर आले. त्यानंतर मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे ATS ने नागपूरमध्ये त्याला पकडले.

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार…मंत्री विखेंच्या सूचना

रुग्णालयात ठेवलेले उपकरण नेमके कुठे आणि कसे तयार करण्यात आले, तसेच त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात असून, फॉरेन्सिक तज्ज्ञ स्फोटक साहित्य आणि टाइमरची रचना तपासत आहेत.

 

Exit mobile version