जानकरांचा केला पाळणा; कांदा आंदोलन चिघळल, शेट्टी, राऊत पोलिसांच्या ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यावर मी चर्चा केली आहे.
आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर (Jankar) यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा मोर्चा काढू नये यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टींसह आंबा बागायतदार ऊत्पादक अध्यक्षांना मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली होती, मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन चिघळलं आहे.
आज वर्षा बंगल्याच्या परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलबांगडी करून नेलं. प्रमुख नेते ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. कांदा विकत घ्या अशी विनंती मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे.