याला गद्दारीच म्हणतात.. बंडू जाधवने मतदारांचा अपमान केला; मी पुन्हा परभणी लढणार…

Mahadev Jankar On Operation Tiger : राज्यातील राजकारणात आज अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Mahadev Jankar On Operation Tiger

Mahadev Jankar On Operation Tiger : राज्यातील राजकारणात आज अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत 6 खासदारांनी नवीन गट स्थापन केला असून आता हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या सहा खासदारांपैकी एक परभणीचे खासदार संजय जाधव देखील आहे.

संजय जाधवांच्या या निर्णयामुळे परभणीत राजकीय वातावरण तापलं आहे. परभणीकरांकडून या निर्णयाचा विरोध होताना देखील दिसत आहे. तर दुसरीकडे आता परभणीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

लेट्सअप मराठीशी बोलताना महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले की, ऑपरेशन टायगर ( Operation Tiger) हे काही नाही. भाजप (BJP) नेहमीच छोट्या पक्षांना संपवण्याचं काम करतो. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी असो, शरद पवारांचा (NCPSP) पक्ष असो किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष असो. भाजपची ताकद असेल तर त्यांनी स्वतःचे आमदार -खासदार निवडून आणावेत आणि मग राज्य करावे.

बंडू जाधव यांच्यावर बोलण्याइतका बंडू मोठा नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर प्रेम केले होते पण गांधींच्या नोटांपुढे बंडू जाधव यांनी परभणीच्या जनतेचा अपमान केला आहे. निवडणुकीत जनतेने त्यांना साथ दिली होती पण त्यांनी आज त्यांची औकात दाखवून दिली. पण मी परभणीकारांना वाऱ्यावर सोडणार नाही. राष्ट्रीय समाज पक्ष आणि मी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची ग्वाही लेट्सअप मराठीशी बोलताना माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

पुढे बोलताना जानकर म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष चुकत नसतो. आम्ही तिकीट देतो, जनतेला विनंती करतो, उमेदवाराला निवडून आणतो पण नंतर तो माणूस विकला जातो आणि अशा लोकांचा इतिहास फार चांगला लिहिला जाणार नाही असं देखील लेट्सअप मराठीशी बोलताना महादेव जानकर म्हणाले. तसेच, ज्या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली ते येणाऱ्या निवडणुकीत निवडून देखील येणार नाही असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

6 खासदारांनंतर 65 नगरसेवकही देणार उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ-

ठाकरेंची साथ सोडणारे खासदार

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असा दावा करण्यात येत आहे.

follow us