बदनामी न थांबविल्यास फौजदारी व आर्थिकदृष्ट्या नुकसान भरपाईचा मोठा दावा करणार; वळसेंचा विरोधकांना इशारा

Dilip Walse Patil -माझी बदनामी चालू ठेवली तर निश्चित तुमच्यावर फौजदारी आणि आर्थिकदृष्टा मोठ्या नुकसान भरपाईचा दावा मी हायकोर्टात दाखल करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

  • Written By: Published:
Dilip Walse Patil

Dilip Walse Patil : पुण्यातील मंचरमधील दूध भेसळीविरुद्ध एफडीएकडून (FDA) मोठी कारवाई झाली आहे. येथील दोन मोठ्या डेअऱ्या एफडीएच्या रडारवर आल्या आहेत. या भेसळीमधील लोकांशी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम (Devdatta Nikam) व इतर नेत्यांनी वळसेंविरोधात राळ उठवली आहे. सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे दिलीप वळसे पाटील हे आता आक्रमक झालेले आहेत. त्यांनी विरोधकांना फौजदारी कारवाई व बदनामीच्या दाव्याचा इशारा दिला आहे.


मोदींच्या विद्यार्थ्यांना माफ करा आवाहनावर अभिजीत दिपकेंचा सवाल; फक्त रीलवर माफी की गुन्हेही मागे घेणार?


अल्पसंतुष्ट लोकांकडून खोटे मोठे आरोप

भेसळ करणारी कंपनी किंवा संस्था कुठलेही जरी असले तरी तरी मी पाठीशी घालणार नाही. एफडीए विभाग त्यांच्यावर कारवाई करायला सक्षम आहे. पोलिस विभाग देखील सक्षम आहे. परंतु जाणूनबूजून माझे चारित्रहनन करण्याच्या दृष्टीकोनातून, मला राजकीयदृष्टीय अडचणीत आणण्यासाठी काही विघ्नसंतोषी, अल्पसंतुष्ट लोक हे पत्रकार परिषदत, सभांमध्ये भूमिका मांडून माझ्यावर खोटे नाटे आरोप करत असल्याचा वळसे यांनी म्हटले आहे.


कुणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय फायद्यासाठी हे आरोप

या संदर्भात पहिल्यांदाच मी भूमिका मांडतोय, अशा प्रकारच्या भेसळीच्या प्रकरणामध्ये माझा कोणताही संबंध आढळून आल्यास मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. त्यासाठी एक मिनिटेसुद्धा वाट पाहणार नाही, असे वळसे यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर विरोधकांना मोठा इशारा देताना वळसे म्हणाले, परंतु खोटेनाटे आरोप जाणीवपूर्वक केले जात आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय फायद्यासाठी हे आरोप होत आहे.

गेले काही दिवस मी मुद्दामहून विरोधकांची भूमिका समजून घेत होतो. या पुढे असाच प्रयत्न सुरू ठेवला. माझी बदनामी चालू ठेवली तर निश्चित तुमच्यावर फौजदारी आणि आर्थिकदृष्टा मोठ्या नुकसान भरपाईचा दावा मी हायकोर्टात दाखल करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. मी तो करणार आहेच. आता तरी अल्पसंतुष्ट लोकांनी माझी बदनामी करण्याचे थांबावे, अन्यथा पुढील कारवाई सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा वळसे यांनी दिलीय.

तो संबंध कुणी सिद्ध केल्यास-वळसे
भेसळीसारख्या चुकीच्या गोष्टीशी माझा संबंध नाही. तो संबंध कुणी सिद्ध करून दिल्यास मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. शेवटी सत्याचा विजय होईल, असे वळसे म्हणाले.

follow us