VVS लक्ष्मण होणार ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’? BCCI च्या नव्या प्लॅनची जोरदार चर्चा
VVS Laxman BCCI Director of Cricket 2024 मध्ये राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मणचे नाव आघाडीच्या दावेदारांमध्ये होते. मात्र...
VVS Laxman likely to become BCCI Director of Cricket : भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एका मोठ्या प्रशासकीय बदलाची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्सचा (CoE) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण याच्यावर आता आणखी मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, लक्ष्मणची ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. अद्याप याबाबत BCCI कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर लक्ष्मणची भूमिका केवळ सेंटर ऑफ एक्सलन्सपुरती मर्यादित राहणार नाही. भारतीय क्रिकेटमधील राष्ट्रीय संघ, निवड समिती, प्रशिक्षक, खेळाडू विकास आणि हाय-परफॉर्मन्स कार्यक्रम यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी लक्ष्मणकडे येऊ शकते.
रोहित शर्माला 2027 विश्वचषकासाठी संघात घ्या; अजिंक्य रहाणेचा रोहीतला पाठिंबा
सप्टेंबरमध्ये होऊ शकतो मोठा बदल
बोर्डातील काही महत्त्वाच्या पदांबाबत आणि व्यवस्थांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे BCCI साठी सप्टेंबर महिना महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटशी संबंधित निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे लक्ष्मणकडे नवी जबाबदारी सोपवली गेल्यास भारतीय क्रिकेटच्या पुढील वाटचालीत त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
लक्ष्मणचाच विचार का?
व्हीव्हीएस लक्ष्मण गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडूंचा विकास आणि हाय-परफॉर्मन्स कार्यक्रम याची जबाबदारी तो सांभाळत आहे. विशेष म्हणजे त्याचे काम केवळ वरिष्ठ खेळाडूंपुरते मर्यादित नाही. तर, युवा क्रिकेटपटूंपासून वरिष्ठ संघातील खेळाडूंपर्यंत त्यांच्या विकास प्रक्रियेत लक्ष्मणचा सहभाग आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या संपूर्ण यंत्रणेची माहिती आणि अनुभव असलेला व्यक्ती म्हणून ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ या पदासाठी लक्ष्मण मजबूत दावेदार मानला जात आहे.
Video : नरेंद्र’ नावामुळे पाकिस्तानी बॉक्सर वैतागला; PM मोदींसमोर भारतीय बॉक्सरने सांगितला किस्सा
‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ झाल्यास काय असेल जबाबदारी?
‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ हे पद BCCIच्या विद्यमान रचनेत समाविष्ट झाल्यास लक्ष्मणची भूमिका व्यापक असू शकते. संभाव्यतः लक्ष्मणकडे टीम इंडिया, निवड समिती आणि प्रशिक्षकांमध्ये समन्वय, युवा खेळाडूंच्या टॅलेंटची ओळख, खेळाडूंच्या विकासाचा दीर्घकालीन आराखडा, हाय-परफॉर्मन्स कार्यक्रमांचे नियोजन, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि राष्ट्रीय संघ यांच्यात समन्वय, युवा खेळाडूंना वरिष्ठ संघासाठी तयार करण्याची प्रक्रिया मजबूत करणे तसेच भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी दीर्घकालीन धोरण तयार करणे आदी जबाबदाऱ्या येऊ शकतात. त्यामुळे ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ ही केवळ प्रशासकीय भूमिका नसून भारतीय क्रिकेटच्या संपूर्ण ‘प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट सिस्टम’वर प्रभाव टाकणारे पद ठरू शकते.
टीम इंडियासोबत लक्ष्मणचा जुना संबंध
लक्ष्मणने भारतीय संघासोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. मुख्य प्रशिक्षक किंवा सपोर्ट स्टाफ उपलब्ध नसताना त्याने यापूर्वीही अंतरिम प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. अलीकडेच त्यानी झिम्बाब्वे दौऱ्यावर युवा भारतीय संघासोबत अंतरिम प्रशिक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली होती. तसेच यापूर्वीही विविध मालिकांमध्ये लक्ष्मणने भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे.
मुख्यमंत्री साहेब.. मला मदत करा, मी तीन वर्षांपासून…, ऋषभ पंतच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ
2024 मध्ये हेड कोच होण्याची संधी का नाकारली?
लक्ष्मणसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका नवीन नाही. 2024 मध्ये राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मणचे नाव आघाडीच्या दावेदारांमध्ये होते. मात्र, त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
CoE वर झालेल्या टीकेलाही दिले होते उत्तर
भारतीय खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्सवरही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावेळी लक्ष्मणने CoEची भूमिका स्पष्ट केली होती. CoE हे केवळ खेळाडूंच्या रिहॅबिलिटेशनसाठीचे केंद्र नाही, तर खेळाडू विकास, फिटनेस आणि भारतीय क्रिकेटच्या संपूर्ण यंत्रणेशी संबंधित व्यापक व्यासपीठ असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. याच अनुभवाचा फायदा आता लक्ष्मणला ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून होऊ शकतो.
सध्या लक्ष्मण सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटची पुढची पिढी घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, डायरेक्टर ऑफ क्रिकेट झाल्यास त्याचे कार्यक्षेत्र वरिष्ठ संघ, निवड समिती, प्रशिक्षक, युवा क्रिकेट आणि खेळाडू विकास कार्यक्रमापर्यंत विस्तारू शकते. मात्र, लक्ष्मणच्या नियुक्तीबाबत BCCI ने अद्याप अधिकृत निर्णय किंवा घोषणा केलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत याबाबत नेमके काय चित्र स्पष्ट होते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.