मुख्यमंत्री साहेब.. मला मदत करा, मी तीन वर्षांपासून…, ऋषभ पंतच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ
Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.
Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. पंतने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदत मागितली आहे. ऋषभ पंतला दिल्लीहून उत्तराखंडमध्ये स्थायिक व्हायचे आहे मात्र त्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्याने आता मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदत मागितली असल्याची माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.
‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये ऋषभ पंतने (Rishabh Pant) सांगितले की, तो गेल्या तीन वर्षांपासून उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्यासाठी जमिनीचा शोध घेत आहे, परंतु त्याला कोणतीही मदत मिळालेली नाही. त्याने उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याकडे मदतीचे आवाहन करत लिहिले की, “नमस्कार सर, कसे आहात? मी मूळचा उत्तराखंडचा आहे आणि बऱ्याच काळापासून माझे घर दिल्लीहून उत्तराखंडला हलवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राहण्यासाठी योग्य आणि मोकळा प्लॉट मिळत नाहीये. माझे माझ्या उत्तराखंडवर खूप प्रेम आहे. कृपया मला जमीन मिळवून देण्यात मदत करावी, अशी मी विनंती करतो, कारण ही प्रक्रिया खूप कठीण झाली आहे.”
पंत पुढे म्हणाला, “माझ्या राज्याचा प्रचार केल्याबद्दल मला जी जमीन मिळायला हवी होती, ती सुद्धा मला अजून मिळालेली नाही. इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून, मला फक्त माझ्या घरी परत यायचे आहे आणि उत्तराखंडच्या विकासात योगदान द्यायचे आहे. मला डोंगराळ भागातील माझ्या लोकांकडे परत जायचे आहे. कृपया या प्रकरणाकडे लक्ष द्यावे. तीन वर्षे झाली आहेत आणि मला अजूनही जमीन मिळालेली नाही. मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.”
@pushkardhami hello sir how’s you ??? It’s a long time for me especially being local from Uttrakhand . I have been trying to buy land to shift my base from Delhi to Uttrakhand and I couldn’t find anything facilitating and big to live here I love my Uttrakhand. My humble request…
— Rishabh Pant (@RishabhPant17) August 7, 2026
विजांच्या कडकडाटासह आज नाशिक, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊस-
श्रीलंका दौऱ्यात ऋषभ पंत व्यस्त
तर दुसरीकडे 15 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी (SLvsIND) मालिकेसाठी ऋषभ पंत जोरदार तयारी करताना दिसत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ तीन दिवसांचा सराव सामना खेळत आहे. पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजांचे वर्चस्व राहिले. ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या दृष्टीने टीम इंडियासाठी दोन्ही सामने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून, श्रीलंका दौऱ्यात पंतकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.