बॅकअप कार, फूड टेस्टिंग टीम अन् डॉक्टर… शी जिनपिंग यांची BRICS साठी सुरक्षा व्यवस्था काय?
BRICS Summit : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी आज भारतात दाखल झाले आहे. शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत कडक सुरक्षा
BRICS Summit : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी आज भारतात दाखल झाले आहे. शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आणि त्यांचा अधिकृत ताफा देखील भारतात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्याच्या दहा दिवसांपूर्वीच बुलेटप्रूफ लिमोझिन आणि एक बॅकअप कार भारतात पोहोचली आहे. माहितीनुसार, जिनपिंग यांच्यासोबत 67 सदस्यांचे शिष्टमंडळ आहे, ज्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते, मुत्सद्दी, विशेष सुरक्षा अधिकारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे. भारतात असताना मायदेशाशी सुरक्षित संपर्क साधता यावा यासाठी त्यांनी स्वतःची दूरसंचार यंत्रणाही सोबत आणली आहे.
जिनपिंग (Xi Jinping) भारतात 24 तास मुक्काम करणार आहेत आणि या दरम्यान त्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असणार आहे. त्यांच्यासोबत आलेले सुरक्षा कर्मचारी ते ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत तिथे तैनात करण्यात आले आहेत. तसेच जिनपिंग हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी हॉटेलमधील प्रत्येक रुमची कसून तपासणी करण्यात आली आहे. तसेच विशेष मेजवानीत (गाला डिनर) दिल्या जाणाऱ्या अन्नाची आणि पदार्थांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तर हॉटेलच्या आसपासचा परिसर ‘नो-फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि संभाव्य रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल किंवा अणु हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या आहेत.
माहितीनुसार, तिबेटी कार्यकर्त्यांच्या निदर्शनांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांमुळे राष्ट्राध्यक्ष शी (Chinese President) यांच्यासाठी या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या भेटीदरम्यान चीनविरोधी प्रचारासाठी ड्रोन, बॅनर्स, लाऊडस्पीकर आणि फुग्यांचा वापर केला जाण्याची शक्यता बीजिंगने वर्तवली होती. भारत सरकारने चीनला त्यांची स्वतःची दळणवळण उपकरणे आणण्याची परवानगी दिली आहे, मात्र सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणांना परवानगी नाही. शिष्टमंडळाला खाजगी परवाना असलेली पिस्तूल बाळगण्याची परवानगी असली तरी, सबमशीन गन किंवा अँटी-ड्रोन उपकरणांसारख्या गोष्टी आणण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही.
🚨 Chinese President Xi Jinping disembarks from his plane in New Delhi, India just in time for the BRICS summit. pic.twitter.com/nH0Dqwo1KR
— Wolf Brief (@wolfbrief_) September 12, 2026
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे जेवण शाकाहारी असेल
तर दुसरीकडे ब्रिक्स परिषदे (BRICS Summit) दरम्यानजिनपिंग यांना शाकाहारी जेवण देण्यात येणार असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही. यानंतर पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक देखील होणार आहे. चिनी अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना स्वयंपाकघरात जाऊन मेनू तपासण्याची आणि पदार्थांची चव घेण्याची परवानगी मिळावी यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे.
#WATCH | Delhi: Chinese President Xi Jinping arrives in Delhi to participate in the BRICS Summit 2026.
PM Modi is scheduled to hold a bilateral meeting with the Chinese President later today. pic.twitter.com/XCJ5lD6gGg
— ANI (@ANI) September 12, 2026
जातेगाव फाट्यावर भरदिवसा दूध चालकावर हल्ला; मानेवर सपासप वार अन्..
भूमिगत पाईपलाईनचेही होणार निरीक्षण
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, हॉटेलच्या परिसरात दहशतवादविरोधी पथके आणि स्फोटक-विरोधी उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. तसेच, अणु-विरोधी, किरणोत्सर्ग-विरोधी आणि जैव-रासायनिक धोके रोखणारी विशेष पथकेही तिथे तैनात करण्यात आली आहेत. हॉटेलच्या भूमिगत पाईपलाईन यंत्रणेचीही तपासणी करण्यात आली आहे.