SS Retail IPO तब्बल 107 पट सब्सक्राइब; बुधवारी लिस्टिंग होणार
SS Retail IPO: SS Retail IPO साठी प्रति शेअर 403 ते 424 असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद झाला.
SS Retail IPO: मोबाइल फोन, अॅक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या SS Retail या मल्टी-ब्रँड रिटेल चेनच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उंदड प्रतिसाद मिळाला आहे. 500 कोटींचा आयपीओ तब्बल 107.41 पट सब्सक्राइब झाला आहे. या आयपीओसाठी ( IPO) 21 सप्टेंबर रोजी शेअर अलॉटमेंट अंतिम होत आहे. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरला चांगला प्रीमियम मिळतोय.
SS Retail IPO साठी प्रति शेअर 403 ते 424 असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद झाला. या इश्यूला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIB) राखीव हिस्सा 214.22 पट, नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 150.33 पट, किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 35.81 पट, तर कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिस्सा 2.72 पट सब्सक्राइब झाला आहे.
अलॉटमेंट स्टेट्स कसे तपासाल?
SS Retail IPO मध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना कंपनीचे रजिस्ट्रार Kfin Technologies किंवा BSEच्या वेबसाइटवर जाऊन अलॉटमेंट स्टेटस तपासता येईल.
23 सप्टेंबरला होऊ शकते लिस्टिंग
SS Retailच्या शेअर्सची NSE आणि BSEवर 23 सप्टेंबरला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर IPOच्या वरच्या प्राइस बँडच्या तुलनेत सुमारे 34.67 टक्के प्रीमियमवर ट्रेड करत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ग्रे मार्केट हे अधिकृत बाजारपेठेचा भाग नाही. त्यामुळे ग्रे मार्केटमधील प्रीमियमच्या आधारावर लिस्टिंगच्या दिवशी शेअरची प्रत्यक्ष कामगिरी निश्चित होईलच असे नाही.
IPOमधून किती शेअर्स जारी झाले?
SS Retailच्या IPOमध्ये 360.75 कोटींचे 85.08 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले. याशिवाय 140 कोटींच्या 33.02 लाख शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) करण्यात आला. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ₹146.40 कोटी उभारले आहेत. आयपीओचा प्राइस बँड 403 ते 424 प्रति शेअर होता.
SS Retail कंपनी काय करते?
SS Retail ही मोबाइल फोन, अॅक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणारी मल्टी-ब्रँड रिटेल चेन आहे. कंपनी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचा मुख्य भर टियर-2, टियर-3 आणि त्यापेक्षा छोट्या शहरांवर आहे. SS Mobile, Mobile Exchange Wala आणि The Mobile Space या ब्रँडच्या माध्यमातून कंपनी स्टोअर्स चालवते.
मिळालेला पैसा कुठे वापरणार?
नवीन शेअर्सच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा वापर आर्थिक वर्ष 2027 आणि 2028 मध्ये नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये SS Retailचा महसूल 47 टक्क्यांनी वाढून 2,352.85 रुपये कोटी झाला. कंपनीचा निव्वळ नफा देखील 49 टक्क्यांनी वाढून 59.28 रुपये कोटी झाला. याआधी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीचा महसूल 1,599.96 रुपये कोटी, तर निव्वळ नफा 39.86 रुपये कोटी होता.