डान्स फ्लोअरवर रंगणार हृता-सारंगची धमाल; ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘बोनिता बोनिता’ गाणं प्रदर्शित

Bonita Bonita : सध्या सर्वत्र ‘आली मोठी शहाणी’ हा चित्रपट त्याच्या वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असून चित्रपटातील हृता दुर्गुळे व सारंग साठ्ये

Bonita Bonita

Bonita Bonita

Bonita Bonita : सध्या सर्वत्र ‘आली मोठी शहाणी’ हा चित्रपट त्याच्या वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असून चित्रपटातील हृता दुर्गुळे व सारंग साठ्ये यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या जोडीची धमाल केमिस्ट्री आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यात पाहायला मिळत आहे. चित्रपटातील ‘बोनिता बोनिता’ हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यात त्यांचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांची एनर्जी, डान्स मूव्ह्ज आणि गाण्याचा मूड यामुळे ‘बोनिता बोनिता’ने लक्ष वेधून घेतलं आहे. या गाण्यात हृता आणि सारंग एकत्र थिरकताना दिसत असून त्यांची ऑनस्क्रीन जुगलबंदी गाण्याला वेगळीच रंगत देते. या गाण्याला सिद्धांत भोसले आणि केतकी माटेगावकर यांचा सुरेल आवाज लाभला आहे. तर गाण्याचे शब्द गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीत दिलं आहे. त्यांच्या आवाजातील सहजता आणि गाण्याचा ठेका यामुळे ‘बोनिता बोनिता’चा मूड आणखी खुलतो.

गाण्याबद्दल संगीतकार पंकज पडघण म्हणतात, “‘बोनिता बोनिता’ हे गाणं करताना आजच्या तरुणाईला आवडेल असा फ्रेश, मोकळा आणि एनर्जेटिक मूड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धांत आणि केतकीच्या आवाजामुळे गाण्याला हवा असलेला चार्म मिळाला आहे. हे गाणं तरुणाई नक्कीच एन्जॉय करेल याची मला खात्री आहे.”

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘हे गाणं चित्रपटातला एक फ्रेश आणि उत्साही मूड घेऊन येतं. हृता आणि सारंगची जोडी या गाण्यासाठी अगदी योग्य वाटली. दोघांनीही डान्स आणि गाण्याची एनर्जी खूप सहजपणे पकडली आहे. गाणं शूट करतानाही त्यांचा उत्साह जाणवत होता आणि तोच पडद्यावरही दिसतो.”

निर्मात्या श्रुती साठे व ईशा मुठे म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’मध्ये प्रत्येक गाण्याला त्याची स्वतःची ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बोनिता बोनिता’ हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच हृता आणि सारंगच्या जोडीची उत्सुकता होती. त्यांना या गाण्यात एकत्र आणण्याची कल्पना खूपच छान जमून आली. त्यांची जोडी या गाण्याला एक वेगळीच गंमत देते. प्रेक्षकांना हा दोघांचा नवा अंदाज नक्की आवडेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

आपल्याच ठेकेदाराला काम द्या नाहीतर ‘ॲट्रॉसिटी’ दाखल करणार; पुणे महापालिका आयुक्तांना सत्ताधारी आमदाराचा धमकीचा फोन-

आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची निर्मिती फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांनी केली आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये प्रमुख भूमिकेत असून ‘आली मोठी शहाणी’ २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version