आपल्याच ठेकेदाराला काम द्या नाहीतर ‘ॲट्रॉसिटी’ दाखल करणार; पुणे महापालिका आयुक्तांना सत्ताधारी आमदाराचा धमकीचा फोन
Naval Kishore Ram : पुणे महानगर पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना फोनवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याने एकच
Naval Kishore Ram : पुणे महानगर पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना फोनवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या ठेकेदाराला रस्स्ताचे 90 कोटी रुपयांचे काम न दिल्यामुळे सत्ताधारी आमदाराने महापालिका आयुक्तांनाच ही धमकी दिली असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारकडून देण्यात आलेल्या धमकीनंतर देखील आयुक्तांनी नियमानुसार पात्र ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेचे नऊ कोटी रुपये वाचणार आहे.
माहितीनुसार, पालिकेने आरटीओ (RTO) ते बंडगार्डन पूल (Bund Garden Bridge) या वर्दळीच्या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून मुळा – मुठा नदीच्या कडेने वेलस्ली रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता दोन लांब असून 17 मीटर रुंद असणार आहे. पालिकेकडून या रस्त्यासाठी 2025 डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. तर आठ ठेकेदारांकडून निविदा सादर करण्यात आल्या होत्या. मात्र आपल्याच ठेकेदाराला हे काम मिळावे यासाठी सत्ताधारी आमदाराने दबाव आणला.
माहितीनुसार, निविदा भरलेल्या एका ठेकेदाराला अपात्र करण्यासाठी सत्ताधारी आमदाराने दबाव आणला होता. त्यामुळे ही प्रक्रिया ठप्प राहिली. ही संपूर्ण प्रक्रिया लक्षात आल्यानंतर महापालिका आयुक्त (Pune Municipal Commissioner) नवलकिशोर कुमार (Naval Kishore Ram) यांनी पक्ष विभागाला नियमानुसार प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला होता. या प्रक्रियेत आमदाराने अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला होता त्याच ठेकेदाराला हे काम मिळाल्याने संतप्त आमदाराने आयुक्तांना फोन करुन ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
याबाबत माहिती आयुक्तांनी पत्रकारांना दिली मात्र तो आमदार कोण याबाबत त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने पुण्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणात महिलेकडून पोलिसांत तक्रार –
तर दुसरीकडे आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठेकेदाराला अपात्र ठरवण्यासाठी आमदाराने दबाव आणला होता त्या ठेकेदाराने 12 टक्के कमी दराने निविदा सादर केली होती तर आमदारांच्या ठेकेदाराने एक टक्का कमी दराने निविदा सादर केली होती.