Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणात महिलेकडून पोलिसांत तक्रार
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. नुकतंच त्यांनी या मागणीसाठी 20 दिवस उपोषण केले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते मात्र मागण्या मान्य न होत असल्याने जरांगे मुंबईकडे निघाले होते मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे उपोषण स्थगित करत राज्य सरकारला 90 दिवसांचा वेळ दिला आहे.
तर दुसरीकडे आता त्यांच्याविरोधात मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर शिवीगाळ, एआय (AI) निर्मित अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी केल्याचा तसेच धमक्या दिल्याचा आरोप करत ललिता तारख (Lalita Tarakh) यांनी अंबड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याविरोधात तक्रार (Police Complaint) दाखल केली आहे. तसेच जे सोशल मीडियावर आपण विकल्याचा आरोप करत आहे त्यांनी 2023 पासून माझ्यासह सर्वांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी देखील माध्यमांशी बोलताना ललिता तारख यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना ललिता तारख म्हणाल्या की, मी अंबड पोलीस ठाण्यात आले होते. एवढे दिवस मी त्यांच्या बाजूने बोलत होते तेव्हा मी त्यांच्यासाठी चांगले होते मात्र आज सत्य बोलले तर समजून घ्या.तुम्ही कमेंट करत आहात, तुमच्या घरी आई- बहीण आहे याचं भान ठेवा. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी. माझी सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, याची सखोल चौकशी करावी. सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मी पैसे घेतले,मला किती लाखांचे पॅकेज आले, तुम्ही प्लॉट घेतला का? असे अनेकजण विचारत आहेत. 2023 पासून माझ्या आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, तुम्हाला सगळं कळेल. कोणाच्या संपत्तीत वाढ झाली हे दिसेल. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सत्य बोलेन, तुम्ही अजूनही भान ठेवून बोला, मला बोलायला लावू नका असं माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला.
कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी, नव्या चित्रपट रूपात
तर दुसरीकडे उपोषण स्थगित केल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांचे अनेक माजी सहकारी गंभीर आरोप करताना दिसत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.