Budget Session : मंज़िल से जरा कह दो..,अभी पहुंचा नही हूँ मैं, फडणवीसांचं मुंडेंना जशास तसं उत्तर

मुंबई : दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं… अशा शेरोशायरीतून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलत होते. […]

Mund

Mund

मुंबई : दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं… अशा शेरोशायरीतून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलत होते.

“इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं….मज़ा तो तब हैं जब खुशबु आपके किरदार से आये…”, असं विधान धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान केलं होतं. मुंडे यांच्या या शेरोशायरीलाही शेर मारुनच जशास तसं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.

यावर फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडेंना एवढंच सांगू इच्छितो की, “दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं”, असं फडणवीस म्हणाले.

पुणे ब्रेकिंग : औंधमध्ये IT अभियंत्याची पत्नी अन् मुलाचा खून करत आत्महत्या; परिसरात खळबळ

आम्ही सादर केलेला अर्थसंकल्प हा कंट्रोल अल्टर आणि शिफ्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचं प्रत्युत्तर राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. अधिवेशनात विरोधकांच्या उत्तराला जशास तसं उत्तर देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आलंय.

हा तर कॉपी पेस्ट अर्थसंकल्प असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यावर खोचक प्रत्युत्तर फडणवीसांनी आज अधिवेशनात चर्चेदरम्यान दिलंय.

यावेळी फडणवीस म्हणाले, आमचा अर्थसंकल्प कॉपी-एडिट-पेस्ट नव्हे, तर कंट्रोल-अल्टर-शिफ्ट असा अर्थसंकल्प आहे. मी धनंजय मुंडेंना अर्थसंकल्प कॉपी-एडिट-पेस्ट वाटला होता. पण त्यांना सांगतो की हा अर्थसंकल्प कॉपी-एडिट-पेस्ट नसून कंट्रोल-अल्टर आणि शिफ्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले आहेत.

Exit mobile version