श्रीरामपूरमधील गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बंटी जहागीरदार याचा मृत्यू

गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच बंटी जहागीरदार यांचा मृत्यू.

Untitled Design (185)

Untitled Design (185)

Bunty Jahagirdar, who was seriously injured in the firing, died : श्रीरामपूरमध्ये(Shrirampur) दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबार प्रकरणात बंटी जहागीरदार याच्या हत्येचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. या हल्ल्यामागे दोन हल्लेखोर असल्याची माहिती असून, दोघेही दुचाकीवरून परिसरात घिरट्या घालत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार(Bunty Jahangirdar) ज्या मार्गावरून येणार होता. त्या मार्गावर हल्लेखोर आधीपासून दबा धरून बसले होते. बंटी जहागीरदार दुचाकीवरून जात असताना, मागून आलेल्या हल्लेखोरांपैकी एकाने अचानक त्याच्या दिशेने दगड फेकला. दगड लागल्यानंतर बंटी जहागीरदार दुचाकीवरून खाली उतरला आणि तोच दगड परत हल्लेखोरांच्या दिशेने फेकला.

याच क्षणी परिस्थिती अधिक चिघळली. दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी जवळ असलेलं पिस्तूल काढत बंटी जहागीरदार याच्यावर बेधुंद गोळीबार केला. या गोळीबारात बंटी जहागीरदार याच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. गोळ्या लागल्यानंतर तो जागेवरच कोसळला.

2025 मधील काही महत्वाच्या घटना; जग युद्धाच्या उंबरठ्यावर; तिसऱ्या महायुद्धाची भीती खरी ठरतेय का?

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मागून येणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी अवस्थेतील बंटी जहागीरदार याला कामगार रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉ. जगधने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार करत प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी बंटी जहागीरदार याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील नागरिकांची गर्दी जमली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती लक्षात घेता, शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात न करता मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. या थरारक घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावाचं वातावरण असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं विविध दिशांनी तपास करत आहेत. हत्येमागील नेमकं कारण काय, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version