Share Market : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. त्याआधी विविध संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. यानंतर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने रेकॉर्ड ब्रेक उसळी घेतली. आज सकाळच्या प्री ओपनिंग मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. शेअर बाजारात आज निफ्टीचा निर्देशांक 3.58 टक्क्यांनी तर सेन्सेक्समध्ये 3.55 टक्क्यांची वाढ दिसून आली. सेन्सेक्समध्ये 2621.98 अंकांची वाढ झाल्यानंतर सकाळच्या सत्रातच सेन्सेक्सने 76 हजारांचा टप्पा पार केला होता. निफ्टीमध्ये 807.20 अंकांची वाढ दिसून आली. त्यामुळे सकाळच्या सत्रात निफ्टी 23 हजार 337 च्याही पुढे गेला होता. यानंतर निफ्टी 23 हजारांवर स्थिरावल्याचे दिसून आले.
‘या’ 7 शेअर्सनी गुंतवणुकदारांना केलं मालामाल; फक्त 5 महिन्यातच 354 टक्क्यांचा परतावा
याआधी शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या अंदाजातून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारचे संकेत देण्यात आले होते. या अंदाजांनंतर आज ज्यावेळी शेअर बाजाराचे कामकाज सुरू झाले त्यावेळी सुरुवातीलाच मोठी तेजी दिसून आली. या एक्झिट पोलनंतर गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळल्याचे दिसून आले.
प्री ओपनिंग सेशनमध्ये दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली. सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली. सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्स 2200 पर्यंत उसळला होता. यानंतर बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर निफ्टीत देखील वाढ पाहण्यास मिळाली. निफ्टी थेट 23 हजार 337 अंकांपर्यंत वाढला होता. या वाढीनंतर सेन्सेक्सने तर 76 हजारांचाही टप्पा पार केल्याचे दिसून आले.
शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरला; वाचा तज्ञांच मत
शेअर बाजार सुरू होण्याआधीच गिफ्ट निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठल्याचे दिसले. गिफ्ट निफ्टीत 823.50 किंवा 3.62 टक्के वाढीसह 23 हजार 524.50 अकांवर पोहोचला. एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात ही तेजी दिसून येत आहे. देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार येण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला.