Dada Bhuse on NCC Training in School : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी (Dada Bhuse) एक मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यात देशाविषयी आदरभाव निर्माण व्हावा यासाठी एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्र सेना) धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्रे वाढवावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राज्यात एनसीसीचा विस्तार करण्यासंदर्भात मंत्रालयात काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती भुसे यांनी माध्यमांना दिली. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांत देशाविषयी आदरभाव निर्माण व्हावा यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जातील. विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्रे वाढवून मिळावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.
Video : गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड खलबत; शिंदेंनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
राज्यात सध्या सात ग्रुप्स, 63 युनिट्स असून यात 1726 शाळा आणि महाविद्यालयांतील 1 लाख 14 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण मिळेल असा सरकारचा विचार आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांची मदत घेण्यात येईल.
मराठी शाळेसोबतच आता (Schools) सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांत आता राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे. याआधी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रगीतासोबत आता राज्यगीतही बंधनकार असणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली घोषणा