Download App

फडणवीसांची ‘ती’ एक नजरचूक महागात पडणार की सुटका होणार? 5 सप्टेंबरला अंतिम निर्णय

  • Written By: Last Updated:

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. फडणवीस यांनी निवडणुक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा करत नागपूरच्या एका वकीलाने त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत ओढले होते. विशेष म्हणजे, हा दावा करणारे वकील सतीश उके (Advocate Satish Uke) हे सध्या तुरूंगात आहेत. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत निर्णय राखून ठेवला. यावर ५ सप्टेंबरला निर्णय देणार आहे.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबततच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्धदाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अॅड. सतीश उके यांनी दाखल केली. याप्रकरणी फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाला करण्यात आली आहे. यापूर्वी युके यांच्या बाजूने युक्तिवादाची आणि साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी सांगितले की, नजर चुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ही आखाड्यात; महादेव जानकरांनी फुंकलं रणशिंग! 

या गुन्ह्यांची माहिती न देण्याचा कोणताही वाईट हेतू नव्हता. तसेच प्रत्येक निवडणुकीत फडणवीस यांना मिळणाऱ्या मतांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. 5 सप्टेंबर रोजी न्यायालय यावर निर्णय देणार आहे. त्यामुळे या प्रकऱणात काय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अॅड. सुबोध धर्माधिकारी, अॅड. उदय डबले, अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी युक्तिवाद केला तर अॅड. सतीश उके हे कारागृहातून दरदृश्य प्रणालीद्वारे बाजू मांडली.

दरम्यान, सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर काही दिवसांनी ईडीने उके यांना अटक केली. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे (एनआयटी) विभागीय अभियंता पंकज पाटील यांच्या या तक्रारीनंतर त्यांची 12 तास चौकशी करण्यात आली. 11.5 कोटी रुपयांच्या हवाला प्रकणात ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसापूर्वी उके यांच्यावर नागपूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us