आगामी लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ही आखाड्यात; महादेव जानकरांनी फुंकलं रणशिंग!

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ही आखाड्यात; महादेव जानकरांनी फुंकलं रणशिंग!

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या वेगाने हालचाली सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज पक्षानेही दंड थोपटलं असून आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांनी(Mahadev Jankar) केली आहे. पुण्यात काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी छोटेखानी ते सभेत बोलत होते.

‘इंडिया’च्या बैठकीसाठी देशातल्या दिग्गज नेत्यांची मुंबईत मांदियाळी, लालूप्रसाद यादव मुंबईत दाखल

महादेव जानकर म्हणाले, राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले, पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचंच काम केलं. ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यानां खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे, आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा महादेव जानकरांनी केली आहे.

बारामती, अमेठी यंदा खालसा करणारच! भाजपने बांधला चंग; 160 जागांसाठी खास फिल्डिंग

तसेच या क्षणाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा कसा करायचा आणि रासपची दिल्ली आणि राज्यात शासन कसं येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वीस वर्षाच्या कार्यकाळात रासापने 4 आमदार, 95 जिल्हा परिषद सदस्य, बेंगलोर, आसाम गुजरातमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. टप्पा टप्प्याने आमची प्रगती चालू आहे. त्यामुळे आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये.

प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा हवीच, टंचाई आढावा बैठकीत विखेंचे आदेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील 543 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत, याचा पुनरुच्चार केला. तसेच मिर्झापूर (उत्तर प्रदेश), परभणी, माढा, बारामती यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करताना सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांना सोबत घ्या असे सांगत सत्तेत आल्यानंतर सर्वाँना समान वाटा देणार असल्याचंही जानकरांनी स्पष्ट केलं आहे.

उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता एन.डी. स्टुडिओ, त्यासाठी देसाईंना धमक्या; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, परभणी जिल्ह्यात आमचे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्ही नक्कीच रासपचा झेंडा नक्की फडकवू. त्यामुळे परभणीत आम्ही कोणासोबत युती करणार नाही. तसेच जानकर परभणीतून लोकसभा लढले तर आपण पूर्ण ताकद लावू आणि त्यांना लोकसभेत पाठवू असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष एस एल अक्की सागर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांच्यासह रासाप चे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिनाडू, गुजरात, राजस्थान सह देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube