‘इंडिया’च्या बैठकीसाठी देशातल्या दिग्गज नेत्यांची मुंबईत मांदियाळी, लालूप्रसाद यादव मुंबईत दाखल

- विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव दाखल झाले आहेत.
- भापजचे कडवे विरोधक राहिलेले लालूप्रसाद यादव हे विमाळतळावर दाखल होताच कॉंग्रेसचे संजय निरुपम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
- तेजस्वी यादव यांचे देखील महाविकास आघाडीच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
- यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, शिवसेना आ. सचिन अहिर उपस्थित होते.
- यावेळी संजय निरुपम आणि लालूप्रसाद यांच्यात चर्चाही झाली. याचे फोटो आता समोर आले आहेत.