प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा हवीच, टंचाई आढावा बैठकीत विखेंचे आदेश

  • Written By: Published:
प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा हवीच, टंचाई आढावा बैठकीत विखेंचे आदेश

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश विखे यांनी दिले आहेत.

Shirdi LokSabha : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरेंसमोर आणखी एक मोठा पेच

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व सिंचनासाठीच्या वापराचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पाऊस कमी झाला असल्यामुळे गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठयाच्या मागण्या प्राप्त होतील. ज्या ज्या गावातून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी येईल अशा ठिकाणी टँकर मंजूर करत पाणी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात यावे.

कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचाच, आमदार काळेंच्या दाव्याने कोल्हेंसमोर पेच

गावामध्ये पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक ठरविण्यात यावे. प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पाणीपुरवठ्यामध्ये नागरिकांची तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिले. जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चार विकत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांना चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांनी उत्पादीत केलेला चारा शासन खरेदी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तसेच तातडीने किती चारा उपलब्ध होऊ शकतो याची माहिती घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ.किरण लोहमटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube