बारामती, अमेठी यंदा खालसा करणारच! भाजपने बांधला चंग; 160 जागांसाठी खास फिल्डिंग

बारामती, अमेठी यंदा खालसा करणारच! भाजपने बांधला चंग; 160 जागांसाठी खास फिल्डिंग

नवी दिल्ली : अमेठी, बारामतीसह 2014 आणि 2019 मध्ये न जिंकता आलेले 160 मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणुकीत जिंकणारच असा चंग भाजपने बांधला आहे. या 160 जागांसाठी भाजपने खास प्लॅन बनविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांना या जागांवर निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून भाजप इथले उमेदवार वेळेपूर्वीच जाहीर करणार आहे. स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या जागांवरील नियोजनासाठी वैयक्तिक लक्ष घालणार आहेत. (BJP has focused on 160 seats across the country including Amethi, Baramati and Mainpuri constituency)

कोणत्या मतदारसंघासाठी भाजपने केले नियोजन?

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अमेठी मतदारसंघ, राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ, सपा नेत्या डिंपल यादव यांचा मैनपुरीसह देशभरातील 160 जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी निवडणुकीत इंडिया विरुद्ध भाजप अशी लढत डोळ्यासमोर ठेवून भाजपने या जागा जिंकण्यासाठी खास प्लॅन बनविला आहे. या मतदारसंघांमध्ये उमेदवारांना उमेदवारीची खात्री मिळावी आणि तयारीसाठी वेळ मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यातील काही जागांवरील उमेदवार वेळेपूर्वीच जाहीर करण्याचे भाजपचे नियोजन आहे.

राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र

भाजपने बारामतीसाठी लावली ताकद :

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघासाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे धुरा दिली आहे. त्यांचा यापूर्वी या मतदारसंघात दोनवेळा दौराही पार पडला. तर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ए फॉर अमेठी, तर बी फॉर बारामती आमची घोषणाच आहे. अमेठी आम्ही जिंकू शकतो. तर बारामती आम्ही जिंकू शकतो, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

‘महायुती सरकार घरी बसणारं नाहीतर लोकांच्या दारी जाणारं’; शंभूराज देसाईंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

राज्यातील युतीचे समीकरण बदललं असून अजित पवारांनी राष्ट्रवादीशी बंड करून भाजपची युती केली केल्याने बारामती परिसरात भाजपची ताकद आज घडीला वाढलेली आहे. मात्र यानंतर देखील केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, उमेदवार चाचपणीसोबत भाजपने बारामतीसाठी स्वतंत्र शिलेदारही नेमला आहे. भाजपने पुणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण (बारामती) म्हणून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वासुदेव काळे यांची नियुक्ती केली आहे. काळे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघ बांधणीची आणि वाढीची जबाबदारी आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube