‘महायुती सरकार घरी बसणारं नाहीतर लोकांच्या दारी जाणारं’; शंभूराज देसाईंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
महायुती सरकार केवळ घरात बसून नाहीतर शासन आपल्या दारी उपक्रमातून प्रत्यक्ष दारी जाऊन योजनांचा लाभ देत असल्याचं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. दरम्यान, हिंगोलीतल्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे.
मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार टक्कर
शंभूराज देसाई म्हणाले, महायुती सरकार केवळ घरात बसून नाहीतर शासन आपल्या दारी उपक्रमातून प्रत्यक्ष दारी जाऊन योजनांचा लाभ देत आहे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते लोकांच्या दारी कधीच न जाता स्वतःच्या घरी बसले होते. उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वगुणांमध्ये मोठा फरक असल्याचंही ते म्हणआले आहेत.
अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा, लोकांना सभेसाठी जबरदस्तीनं आणलं; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
महायुती सरकारच्या ‘ शासन आपल्या दारी ‘ या उपक्रमावर उध्दव ठाकरे यांनी टीका करताना, ‘ शासन आपल्या दारी, थापा मारतंय भारी ‘अशा शेलक्या शब्दात भाष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. यापूर्वी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकांच्या दारी कधीही न जाता फक्त स्वतः च्या घरात बसले होते. सध्याचे महायुतीचे सरकार अजिबात थापा मारणारे नाही.
Sanjay Raut : एक राऊत सब पे भारी; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना एकाचवेळी भिडले
शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरूवात आपल्या मतदारसंघातून झाली असता पहिल्याच दिवशी २९ हजार गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आला होता. तेव्हापासून ते काल परभणीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमापर्यंत तब्बल दीड कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घर बसल्या देण्यात आला, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.
दरम्यान, सोमवारी सोलापुरात भेटीस आलेल्या शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपध्दती आणि नेतृत्वगुणांमधील फरक उलगडून दाखविला.