बनावट नियुक्तीपत्राद्वारे PMC मध्ये नोकरीचे आमिष; जेजुरी देवस्थान विश्वस्त राजेंद्र खेडेकरांविरुद्ध गुन्हा

Pune Municipal Corporation : बनावट नियुक्तीपत्रे, बनावट लेटरहेड व शिक्के तयार करून तरुणांना पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवत

Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation : बनावट नियुक्तीपत्रे, बनावट लेटरहेड व शिक्के तयार करून तरुणांना पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जेजुरी देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर, तसेच शिवानंद पाटील आणि नमिता बनसोडे यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 316(2), 318(4), 316(5), 336(2), 338, 336(3), 340(2) आणि 3(5) अन्वये जेजुरी देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर (Rajendra Baban Khedekar) , तसेच शिवानंद पाटील (Shivanand Patil) आणि नमिता बनसोडे (Namita Bansode) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखी किती तरुणांची फसवणूक झाली? या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग होता? बनावट कागदपत्रे आणि शिक्के तयार करण्यामागे कोण होते? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात सखोल तपास करुन ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे आणि ज्यांनी अजूनही आपले पैसे परत मिळतील या आशेने तक्रार केलेली नाही त्यांनी आता पुढे यायला हवे बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कायद्यापासून सुटका होता कामा नये असं सामाजिक कार्यकर्ते विजय कुभार यांनी आवाहन केले आहे.

धर्मेंद्र प्रधानांसह मोदींनीही राजीनामा द्यावा; आमरण उपोषणाची घोषणा करत अभिजीत दिपके आक्रमक

Exit mobile version