Case registered against journalist in Pune : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली एका महिलेचे गुप्त चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित पत्रकाराविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात खळबळ उडाली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, ही घटना तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री एका लॉजमध्ये घडली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन कदम या पत्रकाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरूवातीला या घटनेची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचली, त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली.
तपासादरम्यान स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली चित्रीकरण केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दरम्यान, या घटनेचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संघाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिलेल्या निवेदनात या प्रकाराला अत्यंत घृणास्पद म्हटले असून, यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची प्रतिमा मालिन झाल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच, अशा प्रकारामुळे पत्रकार संघालाही मनस्ताप झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मोठी बातमी! परभणीसह वाशिम, नांदेड, हिंगोलीच्या विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के…
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही यंत्रणा कार्यरत असल्याची चर्चा देखील समोर येत आहे. मात्र, अशा कोणत्याही प्रयत्नांना पुणे श्रमिक पत्रकार संघाचा विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेऊन या प्रकरणात निष्पक्ष कारवाईसाठी पाठिंबा दर्शवला. पत्रकार संघाने आपल्या भूमिकेत स्पष्टपणे नमूद केले आहे की, चुकीचे कृत्य करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराच्या पाठीशी संघ उभाराहणार नाही.
उलट संबंधित आरोपीवर कायदेशीर व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील पत्रकारांची सुरक्षा आणि सन्मान अबाधित ठेवण्यासाठी संघ नेहमीच आक्रमक भूमिका घेत असल्याचे देखील अधोरेखित केले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीसह त्याला मदत करणाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
