Download App

निवडणूक आयोगावर शंका घेतली, नंतर माफीनामा! संजय कुमारांवर गुन्हा दाखल…

Sanjay Kumar : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

Sanjay Kumar :  सीएसडीएसचे (CSDS) संजय कुमार (Sanjay Kumar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत चुकीची आकडेवारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांनी माफी देखील मागितली आहे.

याबाबत नाशिक (Nashik) जिल्हा निवडणूक आयोगाने (Election Office) ट्विट करत माहिती दिली आहे. सीएसडीएसचे संजय कुमार यांनी लोकसभा 2024 आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 126 देवळाली मतदारसंघातील मतदारांची दिशाभूल करणारी माहिती पोस्ट केली आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी फक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून माहिती पडताळून पहावी. असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 राजकीय विश्लेषक आणि सीएसडीएसचे समन्वयक संजय कुमार यांनी 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे काही आकडे ट्विट करत मतदार याद्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते मात्र त्यांनी 19 ऑगस्ट रोजी याबाबत माफी मागत ट्विट डिलीट केला. 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीची तुलना करता चूक झाली होती. संबंधित ट्विट आता डिलीट केले आहेत. असं संजय कुमार यांनी म्हटले आहे. संजय कुमार यांच्या माफीनंतर भाजपकडून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

मोठी बातमी, संजय कुमार यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिली होती चुकीची आकडेवारी 

काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच आकडेवारीच्या आधारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

follow us