Sahar Shaikh : कैसा हराया फेम सहर शेख नॉट रिचेबल; आता नगरसेविका पदही जाणार ?

Sahar Shaikh : कैसा हराया फेम आणि मुंब्रातील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.

Sahar Shaikh

Sahar Shaikh

Sahar Shaikh : कैसा हराया फेम आणि मुंब्रातील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरुन सहर शेख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणामुळे त्यांचं नगरसेविकेचं पद देखील धोक्यात आलं आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन सहर शेख यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यापासून सहर शेख (Sahar Shaikh) गायब झाल्या आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, त्या सध्या नॉटरिचेबल आहेत. या प्रकरणात सहर शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन सखोल चौकशी करण्यात यावी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे. सध्या माहितीनुसार, नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील मुंब्य्रातून गेल्या काही दिवसांपासून गायब झाल्या आहेत.

इंटरनेटवर गाजतोय ‘एक दिन’ चा ट्रेलर, जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्या साधेपणावर चाहते फिदा

नेमकं प्रकरण काय?

नगरसेविका सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखल केला असल्याची तक्रार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांच्याकडून करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत सिद्दीकी फराह शबाब अहमद (Siddiqui Farah Shabab Ahmed) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सहर शेख यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. सहर शेख यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल काही दिवसात येणार आहे.

Exit mobile version